Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अबब होटल मधून चक्क अवैध पेट्रोल विक्री
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील कढोली (बुज.) बनत आहे अवैध व्यवसायचे ठिकाण file image विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी (ग्रामीण) राजुरा - र...

  • राजुरा तालुक्यातील कढोली (बुज.) बनत आहे अवैध व्यवसायचे ठिकाण
file image
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी (ग्रामीण)
राजुरा -
राजुरा तालुक्यातील कढोली (बुज.) येथे अवैध पेट्रोल विक्री जोमात सुरु आहे. अलीकडे शासनाने पेट्रोल बॉटल मध्ये देण्यास बंदी घातली आहे. पेट्रोल हे अत्यंत ज्वलनशील  असल्याने कोणी ही पेट्रोल बॉटल, कॅन इत्यादी मध्ये गोळा करून कुठल्या ही प्रकारचे दुष्कर्म करू शकतो. वाईटकृत्याला आळा  घालता यावा या करिता शासनाने पेट्रोल गाडीच्या टंकी व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या जागी देण्यास बंदी घातली असतांना मात्र  काढोली येथे एक हॉटेल चालक हा आपल्या हॉटेल मधे अवैध पेट्रोल विक्री करत शासन निर्णयाचे उल्लंघन करीत आहे. अवैध स्वरूप खुल्या व अवे-ढावे दरात पेट्रोल विक्री मुळे जाळपोळीचे प्रकरण नाकारता येत नाही. असल्या खुल्या पेट्रोल विक्री मूळे बॉटल, टॅंक, कॅन, इत्यादी मध्ये पेट्रोल नेऊन जाळपाळी चे प्रकरण घळू शकते यावर प्रशासनाने आळा घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top