Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नांदाफाटा येथील मुख्य चौकातील बियर बार आणि देशी दारू दुकाने इतरत्र हलविण्यात यावी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुका प्रेस क्लब ची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - चंद्रपूर जिल्ह्यातील दारू मागील पाच ते सहा वर्षांपूर्व...

  • कोरपना तालुका प्रेस क्लब ची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील दारू मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी संपूर्ण बंद करण्यात आली होती. महाविकास आघाडीचे सरकार येताच विद्यमान पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारू महाराष्ट्र शासनाला मिळत असलेल्या महसुलाच्या नावाखाली पुनश्च सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. यात कुणाला काय फायदा झाला कुणाची किती नुकसान झाले, सामान्य माणसाला किती फरक पडेल हे आत्ताच सांगणे जरा कठीणच आहे. शिवाय पुढे चालून कोणाची किती नुकसान होणार आहे या सर्व गोष्टी बाजूला ठेवता नांदा फाटा येथे लोकसंख्येच्या तुलनेत असलेल्या दारू दुकानांची संख्या ही फार मोठी आहे. या ठिकाणी विदेशी दारूचे सहा दुकान देशी दारूचे दोन याचा जर विचार केला तर दोन हजार लोकसंख्येमागे एक दुकान अशाप्रकारे गणितीय सूत्र जोडते. यातच नांदा फाटा येथे पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या १०० ते ५०० मीटर अंतराच्या आत विदेशी दारूची चार दुकान आहे. शिवाय या परिसरातील मुख्य चौकातून असणारे  ४ शाळा, २ महाविद्यालय, मंदिर, चर्च आणि मस्जिद हे सर्व जवळपास ५०० मीटरच्या आत आहे. यांचा विचार करता बार इथून हटविणे गरजेचे आहे. गावातील भाजी पाला बाजार  आणी मटण मार्केट ही मेन रोड आणि मुख्य चौकातच भरतो. शिवाय महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करता हे दुकान गावाच्या बाहेर स्थानांतरित करणे गरजेचे झाले आहे. एवढेच नव्हे तर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मुख्य गेट ही मुख्य चौकातच आहे. त्यामुळे कंपनीच्या कामगारांची कामाला जाताना व येताना चौकात एकच गर्दी होत असते. दारू सुरू असलेल्या त्या काळच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यास या मेन रोडवरील मुख्य चौकात होणारी गर्दी व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता ही वाढेलेली दिसून येते.. दारू पिऊन दिवसागणिक होणाऱ्या वाद व अपघात होण्याची शक्यता याचा विचार पोलीस प्रशासन व दारू संबंधी प्रशासन स्थानिक प्रशासन यांनी विचार करून पुढील कारवाई करावी. अन्यथा कोरपना तालुका प्रेस क्लबच्या वतीने नांदाफाटा येथील मुख्य चौकात दारू दुकान सुरू झालेल्या दिवसापासून यांच्या विरोधात करण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top