Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: १९७५ च्या आणीबाणीच्या निषेधार्थ गडचांदुर भाजपाचे वतीने पाळला काळा दिवस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मिसा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या आंदोलन कर्त्याचा सत्कार धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदुर - पेट्रोल पम्प चौकात दु. ...

  • मिसा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या आंदोलन कर्त्याचा सत्कार
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
पेट्रोल पम्प चौकात दु. १२ वाजताच्या दरम्यान माजी वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटिवार, माजी केंद्रिय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या सुचनेनुसार  गडचांदुर भारतीय जनता पार्टी च्या वतीने काळा दिवस पाळण्यात आला.
२५ जून १९७५ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी २५ जुन १९७५ च्या मध्य रात्री आणीबाणी लावली व ती पुढे २१ महीने ते २१ मार्च १९७७ पर्यंत होती. इंदिराजींने सत्तेसाठी भारतीय लोकशाहीचा खून करण्याचा पातक केला आहे. अभिव्यक्तीची कलम रद्द केली, मिसा कायदा आणला, जीविताचा अधिकार संपविला, लोकशाहीचा चौथा स्तंभ समजणाऱ्या वर्तमान पत्रावर बंदी आणली. विरोधकांना झोपेतुन उचलुन जेल मध्ये टाकले. एवढेच नव्हे तर अनेक लोकांचा अमानुष छळ केला गेला. अनेक महिने तुरुंगात ठेवले. पवित्र अशा संविधानाचा अवमान करत संपूर्ण देशाला हुकूमशाहीच्या काळ्याकुट्ट अंधारात ढकलणाऱ्या इंदिरा सरकारचा आणि सामान्य भारतीयांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या त्या आणीबाणीचा निषेध करण्यात आला. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन केली तेव्हा त्या आंदोलनात सहभाग घेणाऱ्या नागरीकांना मारझोड करून तुरुंगात डांबले त्या पैकी पु्र्वि बिहारचे रहवासी असलेले हल्ली गडचांदुर येथे वास्तव्यास असलेले महेश शर्मा यांचा शाल श्रीफळ, वाफारा मशीन देवुन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी महेश शर्मा यांनी त्यावेळेस झालेल्या अत्याचार, अन्याय, हुकुमशाही, दडपशाही विषयी माहीती दिली तसेच शहर अधक्ष सतीश उपलेंचवार, गोपाल मालपाणी, प्राचार्य शेख मेहताब, नगरसेवक अरविंद डोहे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार नगरसेवक अरविंद डोहे, गोपाल मालपाणी शहर महामंत्री हरीश घोरे, नगरसेवक रामसेवक मोरे, जेष्ठनेते महादेव एकर, संदीप शेरकी, कृष्णा भागवत, हेमंत पातुरक,र अरुण विधाते, भास्कर उरकुंडे, गणपत बुरडकर, अरविंद कोरे, युवा मोर्चाचे इम्रान शेख, अजीम बेग, युवा तालुका अध्यक्ष रोहन काकडे उपस्थित होते. प्रास्ताविक अरविंद डोहे यांनी तर आभार संदीप शेरकी यांनी केले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top