Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कातलाबोडी ते येरगव्हान रस्त्याची दैनावस्था
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रस्त्याची पाहणी करून तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची मागणी आठ दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलन करू असा इशारा शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालु...

  • रस्त्याची पाहणी करून तातडीने रस्ते दुरुस्त करण्याची मागणी
  • आठ दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलन करू असा इशारा

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुक्रा प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील कातलाबोडि ते येरगव्हान या रस्ताची अनेक दिवसा पासून दैन्यावस्था झाली आहे. हा रस्ता कच्चा असल्यामुळे या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे पावसाचं पाणी खड्यात साचत आहे. खड्यात पाणी साचल्यामुळे रस्ताने जाणे येणे करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरपना हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे कातलाबोडी येरगव्हान येथील अनेक नागरिकांना कामासाठी व त्या बाजूच्या गावकऱ्यांना कोरपना येथे यावे लागत असल्यामुळे नागरिकांनीच आता या रस्त्याची संबंधित विभागाने पाहणी करत लवकरात लवकर रस्त्याचे काम करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. येत्या आठ दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलन करू असा इशारा कवडू गोताडे व गावकऱ्यांनी दिला दिला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top