Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "माणसापासून माणसापर्यंत" मोहिमेअंतर्गत गरजुंना कपडे वाटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सृजन नागरिक मंच राजूराचा उपक्रम आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आपण समाजाचे काही...

  • सृजन नागरिक मंच राजूराचा उपक्रम
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -

अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आपण समाजाचे काही देणे लागतो आपल्या कडून फुल नाही तर कमीत कमी फुलांची पाकळी मदत म्हणून समाजातील गरीब आणि गरजू व्यक्तींना व्हावी या भावनेतून जिवती तालुक्यातील दुर्गम झालीगुडा, नंदप्पा या गावी गरजुंना कपडे वाटप करण्यात आले. या उपक्रमात सृजन नागरिक मंच राजूराचे मिलिंद गड्डमवार, अंकूश शेळके, गोविंद गोरे यांनी सहकार्य केले. 

आपणही करू शकता मदत
प्रत्येकाच्या घरी उत्तम स्थितीतले वापरत नसलेले कपडे, स्वेटर, ब्लॅंकेट घरात अडगळ होऊन पडतात. प्रत्येकांना मदत करायची इच्छा असते पण ते वेळे अभावी व इतरत्र कारणाने त्यांना जमत नाही त्यांनी ते कपडे व वस्तू सृजन नागरिक मंचच्या माध्यमातून गरजवंतांना वाटप करू शकतात. घरात अडगळ  पडलेल्या कपडे वा वस्तूमुळे एखाद्या गरजूला जीवन जगण्यासाठी आधार होऊ शकतात. त्यासाठी अटी फक्त इतक्याच कि, कपडे वापरण्यासाठी योग्य असावेत, कपडे, स्वेटर, ब्लॅंकेट स्वच्छ धुवून द्यावेत. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. आपणं लोकांना कपडे देण्याचे आव्हाहन करून आम्हांस उपकृत केले याबद्दल सृजन नागरिक मंच, राजुरा आपले आभार व्यक्त करते आहे.

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top