- रामपूर - माथरा च्या जंगलात अडवून बेदम मारहाण
- आज सकाळी ६.३० ची घटना
मिळालेल्या माहितीनुसार खामोना-माथरा गावचे माजी सरपंच लहू चहारे हे राजुरा पासून ५ किमी अंतरावर असलेल्या माथरा या गावी राहतात. त्यांचे तिथे किराणा, दूध विक्रीचे लहान दुकान आहे. दुकानासाठी ते दररोज पाकिटाचे दूध घेण्याकरिता राजुरा ला येत असतात. आज सकाळी नेहमी प्रमाणे दूध घेऊन दुचाकीवर जात असताना रामपूर - माथरा च्या जंगलात दोन तोंड झाकलेल्या इसमांनी त्यांची अडवणूक करून, गाडीवरून खाली पाडत मोठा समाजसेवक बनत आहे, तक्रारी करून परेशान करत आहे म्हणत शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. समोरून दुसऱ्या गाड्या येत असतानाचे पाहत मारेकऱ्यांनी पळ काढला. माजी सरपंच लहू चहारे यांच्या पायाला जबर मार लागला असून मेडिकल करिता त्यांना चंद्रपूरच्या दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. पोलिसात झालेल्या घटनेची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या कोणत्याही समस्येच्या निराकरणा करिता नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या माजी सरपंच लहू चहारे यांना मारहाण का करण्यात आली हे मारेकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतरच कळू शकणार आहे.
श्री लहूजी चहारे यांच्या मारहाणीचा निषेध व्यक्त करावा तेवढा कमीच आहे.
उत्तर द्याहटवाया घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे,आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे
उत्तर द्याहटवा