- सृजन नागरिक मंच राजूराचा उपक्रम
राजुरा -
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आपण समाजाचे काही देणे लागतो आपल्या कडून फुल नाही तर कमीत कमी फुलांची पाकळी मदत म्हणून समाजातील गरीब आणि गरजू व्यक्तींना व्हावी या भावनेतून जिवती तालुक्यातील दुर्गम झालीगुडा, नंदप्पा या गावी गरजुंना कपडे वाटप करण्यात आले. या उपक्रमात सृजन नागरिक मंच राजूराचे मिलिंद गड्डमवार, अंकूश शेळके, गोविंद गोरे यांनी सहकार्य केले.
आपणही करू शकता मदत
प्रत्येकाच्या घरी उत्तम स्थितीतले वापरत नसलेले कपडे, स्वेटर, ब्लॅंकेट घरात अडगळ होऊन पडतात. प्रत्येकांना मदत करायची इच्छा असते पण ते वेळे अभावी व इतरत्र कारणाने त्यांना जमत नाही त्यांनी ते कपडे व वस्तू सृजन नागरिक मंचच्या माध्यमातून गरजवंतांना वाटप करू शकतात. घरात अडगळ पडलेल्या कपडे वा वस्तूमुळे एखाद्या गरजूला जीवन जगण्यासाठी आधार होऊ शकतात. त्यासाठी अटी फक्त इतक्याच कि, कपडे वापरण्यासाठी योग्य असावेत, कपडे, स्वेटर, ब्लॅंकेट स्वच्छ धुवून द्यावेत.
आपणं लोकांना कपडे देण्याचे आव्हाहन करून आम्हांस उपकृत केले याबद्दल सृजन नागरिक मंच, राजुरा आपले आभार व्यक्त करते आहे.
उत्तर द्याहटवा