आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
झरी जामनी -
घरकुल कसे असायला पाहिजे त्याचे बांधकाम कश्या पद्धतीने करावे हे जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचा उद्देशाने प्रत्येक पंचायत समिती मध्ये डेमो हाऊस चे बांधकाम करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने पंचायत समिती झरीजामणीच्या प्रांगणात डेमो हाऊसचे भूमिपूजनाचा कार्यक्रम झरीजामणी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्या हस्ते सदर डेमो हाऊसचे करण्यात आले. सदर डेमो हाऊसची एकुण किंमत २,७८००० रूपये एवढी आहे. पंचायत समितीला रु 2,00,000/- एवढा निधी AFMS प्रणालीवरुन उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या रु 2,00,000/- पैकी जास्तीत जास्त रु 1,40,000/- एवढा निधी आपल्याला मटेरीयल खरेदी करता वापरता येईल. तसेच सदर डेमो हाउस बांधकाम करताना मिस्री व मजुरांना दयावयाची मजुरी व गवंडी प्रशिक्षणा करीता रु 90,750/- एवढा निधी पंचायत समितीला उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या गवंडी प्रशिक्षण करीता जास्तीत जास्त 5 (गवंडी/मजुर) लावता येतील एकुण जास्तीत जास्त 45 दिवसात आपल्याला काम पुर्ण करावयाचे आहे. अशी माहिती पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी दिली
ह्या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद सदस्या सौ. संगीता सुरेश मानकर, सुरेश मानकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, विस्तार अधिकारी पंचायत एस.जे. इसलकर, पंचायत विस्तार अधिकारी सुधाकर जाधव, शा.अ. वलथरे, स.ले. अ. नगराळे, विष्णु निकोडे, माकोडे, कांगणे, महेश मांडवकर, गेडाम, दर्शन पाटील, संतोष मेंढे व संपुर्ण पंचायत समिती कर्मचारी वृंद ह्या भुमिपुजन कार्यक्रमाला उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.