Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कलम 370 हटवणे अतिशय दुखद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
काँग्रेसची सत्ता आल्यास फेरविचार केला जाईल पाकिस्तानी पत्रकाराशी संवाद साधताना काँग्रेस नेते दिग्विजिय सिंह यांचे विधान आमचा विदर्भ - ब्युरो...

  • काँग्रेसची सत्ता आल्यास फेरविचार केला जाईल
  • पाकिस्तानी पत्रकाराशी संवाद साधताना काँग्रेस नेते दिग्विजिय सिंह यांचे विधान

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
कल्ब हॉऊस चॅटवरील एक ऑडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर बोलत आहे. काश्मीरमध्ये ज्यावेळी कलम 370 हटवले गेले त्यावेळी लोकशाही मुल्याचे कोणत्याच प्रकारचे पालन केले गेले नसल्याचे ते म्हणाले. या विरोधात आवाज उठवण्यार्‍या प्रत्येक व्यक्तीला कोठडीत बंद करत मानवता कायम ठेवली नसल्याचे सिंह म्हणाले. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास या निर्णयावर फेरविचार करत हा कायदा लागू करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

पाकिस्तानी पत्रकारांनी विचारला होता प्रश्न
राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह हे देश-विदेशातील काही पत्रकारांसोबत व्हर्च्युअली बोलत होते. दरम्यान, शाहजेब जिलानी यांनी कलम 370 शी संबंधित प्रश्न सिंह यांना विचारला. जिलानी हे पाकिस्थानी पत्रकार असल्याचा दावा केला जात आहे. जिलानी यांनी विचारले की, विद्यमान मोदी सरकार गेल्यावर भारताला दुसरा पंतप्रधान मिळेल. त्यामुळे काश्मीरबाबत पुढील मार्ग काय असणार? मला माहिती आहे की, भारताची सध्याची परिस्थिती काय आहे. त्यामुळे हा मुद्दा दुर्लक्षित आहे. परंतु, हा मुद्दा असा आहे जो दीर्घकाळापर्यंत दोन्ही देशांमध्ये होता.

ट्विटर प्रोफाइलनुसार, जिलानी बीबीसीची माजी रिपोर्टर असून ते जर्मनीमध्ये राहतात. त्यांनी पाकिस्तान, बेरूत, वॉशिंग्टन आणि लंडनमध्ये काम केले आहे. यापूर्वी ते डीडब्ल्यू न्यूजशीही संबंधित होते: परंतु, आपली ओळख करुण देताना ते सध्या डीडब्ल्यू न्यूजसाठी कार्यरत असल्याचे सांगितले.

धार्मिक कट्टरतावाद समाजासाठी धोकादायक
जिलानी यांचे प्रश्नांचे उत्तर देताना दिग्विजय यांनी सांगितले की, ''मला वाटते की, कोणत्याही समाजासाठी धार्मिक कट्टरतावाद हे जास्त धोकादायक आहे. मग ते हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख यांच्याशी संबंधित असो. धार्मिक कट्टरतावाद हा द्वेषास कारणीभूत ठरतो आणि द्वेषामुळे हिंसा भडकते.'

ते पुढे बोलताना म्हणाले की, “प्रत्येक व्यक्तीला स्वतःची परंपरा आणि श्रद्धा पाळण्याचा अधिकार आहे हे समजावून सांगावे लागेल. कोणावरही आपली श्रद्धा, भावना किंवा धर्म लादण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे ते म्हणाले.

या निर्णयावर पुनर्विचार करावा लागेल - दिग्विजय सिंह
कॉंग्रेस नेते म्हणाले की, मुस्लिम बहुल राज्यात एक हिंदू राजा होता. दोघांनी एकत्र काम केले. काश्मिरी पंडितांना काश्मीरमधील सरकारी सेवेत आरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे कलम 370 रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर राज्याचा दर्जा कमी करणे अत्यंत दुखद असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास या निर्णयावर फेरविचार करत हा कायदा लागू करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

ऑगस्ट 2019 मध्ये हटवले होते कलम 370
केंद्रातील मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी कलम 370 रद्द केली होती. सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखला स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश बनवले होते. जम्मू-काश्मीरमध्ये 20 आणि लडाखमध्ये लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता.

भाजपचा प्रश्न - ही कॉंग्रेसची भूमिका आहे का?
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विधानावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, सिंह यांच्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी काय विचार करतात? काँग्रेसचीही ही भूमिका आहे का? राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे अशी आमची मागणी पात्रा यांनी केली आहे.
तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, कॉंग्रेसचे पहिले प्रेम पाकिस्तान असून दिग्विजय यांनी राहुलचा संदेश पाकिस्तानला पाठवला आहे. काश्मीर हस्तगत करण्यात पाकिस्तानला काँग्रेस मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top