- तब्बल ३४ लोकांना विकून ५ कोटी रुपयांची फसवणूक
- नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
राजश्री अमरदीप कांबळे (वय ५२), मनीषा अमरदीप कांबळे (वय ३०), किरण समर्थ (वय ३०), मेंढे, वासुदेव इंगोले (वय ४५), शाहनवाज खान (वय ४५), एसआरबी कंपनीचा संचालक संदीप सहदेव मेश्राम (वय ३८), आकाश भारद्वाज (वय ४०) आणि राम किशोर रहांगडाले (वय ३८) अशी आरोपींची नावे आहेत. वर्षा विजय भुरे (वय ३६, रा. शासकीय वसाहत, रविनगर) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. अनेक वर्षांपूर्वी गोरेवाडा येथील वनविभागाची काही जमीन महापालिकेने घेतली होती. मात्र, महापालिकेने त्या जमिनीचा वापर न केल्याने ती पुन्हा वनविभागाला परत करण्यात आली. याची माहिती आरोपींना होती. आरोपींनी संगनमताने त्या जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर त्या जमिनीच्या विक्रीचे व्यवहार आपापसात करून २०१८मध्ये त्यावर लेआउट टाकले. त्यावरील भूखंडांची लोकांना लाखो रुपयांमध्ये विक्री करण्यात आली. काही दिवसांपूर्वी महापालिकेने ती जमीन वनविभागाला परत केली. वनविभागाने जमिनीचा ताबा घेण्यापूर्वी जमिनीची मोजणी केली असता, लोकांना ही जमीन आपल्या मालकीची नसल्याचे समजले. त्यांनी आरोपी राजश्री व इतरांशी संपर्क साधून पैसे परत मागितले. मात्र, आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांत तक्रार करण्यात आली. आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मसाळ यांच्या मार्गदर्शनात चौकशी करून गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.