Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ब्रेकिंग न्यूज - माजी सरपंचावर लोखंडी रॉडने हल्ला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामपूर - माथरा च्या जंगलात अडवून बेदम मारहाण आज सकाळी ६.३० ची घटना आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - मोठा समाजसेवक बनत आहे, तक्रारी कर...

  • रामपूर - माथरा च्या जंगलात अडवून बेदम मारहाण
  • आज सकाळी ६.३० ची घटना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
मोठा समाजसेवक बनत आहे, तक्रारी करून परेशान करत आहे म्हणत शिवीगाळ करत लोखंडी रॉडने माजी सरपंचाला मारहाण केल्याची घटना आज सकाळी ६.३० च्या दरम्यान राजुरा तालुक्यातील रामपूर-माथरा च्या जंगलात घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार खामोना-माथरा गावचे माजी सरपंच लहू चहारे हे राजुरा पासून ५ किमी अंतरावर असलेल्या माथरा या गावी राहतात. त्यांचे तिथे किराणा, दूध विक्रीचे लहान दुकान आहे. दुकानासाठी ते दररोज पाकिटाचे दूध घेण्याकरिता राजुरा ला येत असतात. आज सकाळी नेहमी प्रमाणे दूध घेऊन दुचाकीवर जात असताना रामपूर - माथरा च्या जंगलात दोन तोंड झाकलेल्या इसमांनी त्यांची अडवणूक करून, गाडीवरून खाली पाडत मोठा समाजसेवक बनत आहे, तक्रारी करून परेशान करत आहे म्हणत शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. समोरून दुसऱ्या गाड्या येत असतानाचे पाहत मारेकऱ्यांनी पळ काढला. माजी सरपंच लहू चहारे यांच्या पायाला जबर मार लागला असून मेडिकल करिता त्यांना चंद्रपूरच्या दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. पोलिसात झालेल्या घटनेची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या कोणत्याही समस्येच्या निराकरणा करिता नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या माजी सरपंच लहू चहारे यांना मारहाण का करण्यात आली हे मारेकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतरच कळू शकणार आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. श्री लहूजी चहारे यांच्या मारहाणीचा निषेध व्यक्त करावा तेवढा कमीच आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. या घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे,आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top