Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोना काळातील विदयार्थ्यांची परीक्षा फी आणि विविध शुल्कामध्ये मोठी कपात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या मागणीला यश विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली वि...

  • गोंडवाना यंग टीचर्स संघटनेच्या मागणीला यश

विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली विद्यार्थी व पालकांची आर्थिक आणि मानसिक कमकुवत परिस्थिती लक्षात घेता गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन ने विद्यापीठाकडे कोरोना काळातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी आणि विविध शुल्क यामध्ये सरसकट माफी अथवा कपात करण्याची मागणी केली होती. या संघटनेच्या मागणीला यश प्राप्त झाले असून विध्यापीठाने विदयार्थ्यांच्या परिक्षा फी आणि विविध शुल्क यामध्ये मोठी कपात केली असून यासंदर्भात आज परिपत्रक निर्गमित केले आहे. यामुळे विध्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोंडवाना विद्यापीठाने येत्या शैक्षणिक सत्र 21-22 करिता इंद्रधनुष्य, आव्हान, आविष्कार, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी संघ शुल्क, वैद्यकीय तपासणी अर्ज शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क 100 टक्के माफ करण्यात आले आहे. प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क, आणि पर्यावरण शुल्क यामध्ये 50 टक्के कपात करण्यात आली असून उन्हाळी 2020 परिक्षेकरिता सर्व नियमित विद्यार्थ्यांकारीता फी मध्ये सरसकट 10 टक्के फी कपात करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांना देय असलेल्या विविध फी आणि शुल्का मध्ये कपात केल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स ने सातत्याने विद्यार्थी हित लक्षात घेऊन कोरोना काळातील विद्यार्थ्यांची फी माफी किंवा सवलत देण्याची मागणी केली होती. संघटनेच्या या मागणीला यश प्राप्त झाले असून विद्यापीठाने विविध सदराखाली विदयार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या फी आणि शुल्कामध्ये मोठी कपात केली आहे. 

संघटनेच्या यशस्वी लढ्याबद्दल संघटनेचे  सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थीहिताचा प्रश्न सोडविल्याबद्दल संघटनेने विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आहे.

बातम्या अधिक आहेत.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top