Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यातील बोरीनवेगाव येथे कृषी संजवनी मोहीम अंतर्गत पीक स्पर्धा रब्बी हंगाम कार्यक्रम धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचा...

  • कोरपना तालुक्यातील बोरीनवेगाव येथे कृषी संजवनी मोहीम अंतर्गत पीक स्पर्धा रब्बी हंगाम कार्यक्रम
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील बोरीनवेगाव येथे कृषी संजवनी मोहीम अंतर्गत कार्यक्रम पीक स्पर्धा रब्बी हंगाम 2020-21 अंतर्गत विभागीय स्तर प्रथम क्रमांक रामचंद्र हिरामण कुडमेथे व कृषी सहायक बी.एल. तिडके व भाजीपाला उत्पादक हबीब शेख यांचा सत्कार उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी रविंद्र ढमाळे, कृषी सहायक कोकणे मैडम, बी.जी. बेवनाळे, डी.बी. भगत, डि.यु. कुळमेथे, बिबी येथील प्रगतीशील शेतकरी हबीब शेख, साईनाथ कुंभारे, शंकर तडस, अंबुजा फाउंडेशनच्या कामटकर, कृषीमित्र योगेश केराम आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांनी शेतीचे तंत्र समजून उत्पन्न घेतले तरच ती फायद्याची ठरेल. त्याकरिता संपूर्ण जीव लावून शेती करावी लागेल, असे मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांनी केले. साईनाथ कुंभारे यांनी शेतीमधील नवीन प्रयोगाचे अनुभव सांगितले. तर भाजीपाला उत्पादक हबीब शेख यांनी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बोरी नवेगाव येथील शेतकरी उपस्थीत होते.

बातम्या अधिक आहेत......

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top