Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "डॉक्टर्स डे" उत्सवा निमित्य सेवा सप्ताह कार्याची सुरवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डॉक्टरांनी हिर-हिरीने सहभागी व्हावे - आयएमए अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे आयएमए चंद्रपूर चा उपक्रम शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - ...

  • डॉक्टरांनी हिर-हिरीने सहभागी व्हावे - आयएमए अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे
  • आयएमए चंद्रपूर चा उपक्रम
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
येत्या 1 जुलै रोजी राष्ट्रीय "डॉक्टर्स डे" मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्याने चंद्रपूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टर्स डे च्या निमित्याने विविध प्रकारचे उपक्रम चंद्रपुरात राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये रोगनिदान शिबीर, वृध्दाश्रमाना भेटी देणे, कोरोनाच्या संकटात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉक्टर कुटुंबाला भेटी देणे व रोगनिदान शिबिराच्या माध्यमातून कान, नाक, घसा तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तापासनी, दंतरोग तपासनी या सारख्या तपासणी करण्यात येणार आहे. आज या सेवा कार्याच्या उपक्रमाची सुरवात चंद्रपुरातील वाहतूक पोलीस निरीक्षक कार्यालयातून करण्यात आले यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, पोलीस उपअधीक्षक (गृह) शेखर देशमुख यांची उपस्थिती होती. त्यावेळी चंद्रपूर आय.एम.ए. शाखेचे अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी या सामाजिक उपक्रमात डॉक्टरांनी सहभागी होऊन हिर-हिरीने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी सदर कार्यक्रमाला इंडियन डेंटल असोसीएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण घोडे, आय.एम.ए चंद्रपूरचे सचिव डॉ. अनुप पालीवाल, इंडियन डेंटल आसोसीएशनचे सचिव आशिष गजभे, आय.एम ए. चंद्रपूरचे कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण पंत, महिला शाखेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा घाटे, महिला शाखेच्या सचिव डॉ. नगीना नायडू, डॉ. पल्लवी इंगळे, डॉ.प्रसन्न मद्दीवार, डॉ.अमित देवईकर, डॉ.अभिषेक दीक्षित, डॉ.कुणाल कापर्तीवार, डॉ.उमेश अग्रवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. आशिष वरखडे, डॉ.सुधीर रेगुंडवार, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ.करुणा रामटेके, डॉ. प्रीती चौहान यांनी परिश्रम घेतले. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top