Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अखेर कामगार एकते पुढे नमले दालमिया व्यवस्थापन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सतत 5 तासाच्या बैठीकीनंतर वाद संपुष्टात दालमिया प्रशासनाने दिला 16 लाख रुपयांचा चेक व परिवारातील 2 मुलांना नोकरी दालमिया सिमेंट कंपनीत कंत्र...

  • सतत 5 तासाच्या बैठीकीनंतर वाद संपुष्टात
  • दालमिया प्रशासनाने दिला 16 लाख रुपयांचा चेक व परिवारातील 2 मुलांना नोकरी
  • दालमिया सिमेंट कंपनीत कंत्राटी कामगाराचा ऊंचीवरून पडून मृत्यू प्रकरण
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
सिमेंट उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत काम करीत असताना  दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून एका कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना काल 29 जून 21 ला दुपारी 2.00 वाजताच्या सुमारास घडली. संतोष चव्हाण वय 28 वर्ष रा. नांदा फाटा असे मृत कामगारांचे नांव होते. 

नारंडा येथील दालमिया सिमेंट प्लांट मधे संतोष चव्हाण हा शिवा इंजिनिअरिंग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. तो आज दुपारी इ एस पी इमारत येथून अचानक खाली पडल्याने अपघात ग्रस्त झाला होता. त्याला तात्काळ गडचांदूर येथील ग्रामीण रग्णालयात नेण्यात आले. गडचांदूर येथील रग्णालयात दाखल करताच क्षणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दालमिया सिमेंट कंपनीतील सर्व युनियनचे पदाधिकारी व सोबतच दालमिया कंपनीचे व्यवस्थापन कमीटी सुद्धा रुग्णालयात पोहोचले होते.याच्या परिवाराला आर्थिक मोबदल्यासह त्याचे परिवारातील व्यक्तीला दालमिया कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामावर घ्यावे याकरिता परिसरातील सर्व राजकीय कार्यकर्त्यांसह कामगार एकवटले होते. जवळपास ५ तास गडचांदूर ग्रामीण रुग्णालयासमोर सर्वांनी ठिय्या मांडलला होता. ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येत कामगार व गावातील लोकं जमल्या मुळे स्थिती हाताबाहेर जाऊ नये करिता गडचांदुरचे उप विभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक, ठाणेदार गोपाल भारती आपल्या पोलीसयंत्रणे सोबत हजर होते. अखेर 4 ते 5 तासाच्या चर्चेनंतर दालमिया सिमेंट उद्योगाला मागण्या मंजूर कराव्या लागल्या. दालमिया प्रशासनातर्फे पराग पंपट्टिवार, उमेश कोल्हटकर (एच.आर. प्रमुख) यांनी मृतकाचे परिवाराला मोबदल्या स्वरूपात 16 लाख रुपयांचा धनादेश व लेखी करार करून दोन मुलांना नोकरी देण्याचे मान्य केले आहे.  

याकरीता सुशील कुमार नायक उपविभागीय पोलिस अधिकारी गडचांदूर यांनी खरोखर मोलाची भूमिका बजावल्याने मृतकाच्या परिवाराला कंपनीकडून आर्थिक मदत व 2 जणांना नोकरी मिळाली तब्बल 6 तास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वत हजर होते. मृतक कामगारच्या मागणी करिता दालमिया सिमेंट कामगार संघटनाचे महासचिव श्रीनिवास घाडगे, कार्याध्यक्ष उत्तम उपरे, अल्ट्राटेक कामगार संघटनेचे महासचिव साईनाथ बुच्चे, सुनील ढवस, प्रकाश बोरकर, माणिकगड सिमेंट कामगार संघटनेचे महासचिव आर. पांडे, उपाध्यक्ष राजेंद्र बिले, आशिष देरकर, अभय मुनोद, विक्रम येरने, अजय मानवटकर, सुमेंदर ठाकुर व मोठ्या संख्येत कामगार  ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते. दालमिया कामगार तर्फे शंकर आदोडे, अशोक बोढे, राहुल खेलुरकर, मारोती बोबडे, अमोल वारारकर सोबत शेकड़ो कामगारानी सहकार्य केले.

बातम्या अधिक आहेत....

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top