Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रस्ता रुंदीकरण खोदकाम करतांना शिबला-पार्डी मार्गावर सापडले पुरातन कोरीव दगडी खांब
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जनतेमध्ये कुतूहल, पुरातत्व विभागाकडून संशोधनाची गरज प्रेम नरडलवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी झरीजामणी - झरीजामणी ते पांढरकवडा या रस्त्याचे रुंद...

  • जनतेमध्ये कुतूहल, पुरातत्व विभागाकडून संशोधनाची गरज
प्रेम नरडलवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
झरीजामणी -
झरीजामणी ते पांढरकवडा या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे. शिबला-पार्डी या रस्त्यावर रुंदीकरणादरम्यान पुरातन दगडी कोरीव खांब सापडल्याने याबद्दल परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरत आहे. याविषयी तज्ञ अभ्यासकांकडून व पुरातत्त्व विभागाकडून संशोधनाची गरज असून या भागात प्राचीन काळी कोणते साम्राज्य होते किंवा आणखीन काय होते हे पाहणे गरजेचे आहे. 

15 ऑगस्ट 1992 ला झरीजामणी तालुका अस्तित्वात आला. तालुका झाल्यापासून या भागांमध्ये पक्या रस्त्यांचे जाळे विणण्यात आले. आता झरी ते पांढरकवडा या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. याच मार्गावर शिबला-पार्डी या रस्त्याच्या कडेला डोंगर आहे. रस्ता रुंदीकरणाकरिता रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगर खोदण्यात येत आहे. यामध्ये पुरातन दगडी कोरीव खांब सापडले असून हे दगडी कोरीव खांब येथील पुरातन साम्राज्याची ओळख करून देत आहे. हा भाग पूर्वीपासूनच आदिवासीबहुल भाग आहे. झरी तालुक्यापासून जवळच असलेल्या कायर येथे गोंड राजा च्या साम्राज्याचे अस्तित्व होते असे बोलल्या जाते कदाचित या भागापर्यंत गोंड राज्याचे साम्राज्य असावे येथे सापडण्यात आलेले कोरीव दगडी खांब राजवाड्याचे अवशेष आहे की आणखीन काय आहे याचे पुरातत्व विभागाकडून व तज्ञ व्यक्तीकडून संशोधन होणे गरजेचे आहे. या भागात असलेल्या आणखीन पुरातत्त्व अवशेषांचा शोध लागेल या भागाचे महत्त्व वाढेल झरी जामनी सारख्या छोट्या तालुक्यात अनेक रहस्यमय बाबी, अवशेष पुरातन काळापासून आहे परंतु ते दुर्लक्षित आहेत. यापूर्वी झरी पासून सहा किलोमीटर अंतर असलेल्या खापरी जंगलात विविध आकाराचे पुरातन दगड सापडले आहेत. मंगली येथे पुरायन मंदिर आहे. या भागात सापडलेल्या पुरातन अवशेषांनी पुरातत्त्व वस्तूंचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना चांगली संधी निर्माण होऊ शकेल व या भागातील महत्व विशद होईल.

बातम्या अधिक आहेत....

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top