Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: लकव्यामुळे अडीच वर्षे पडला होता बाजेवर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोव्हीशील्डचा पहिला डोज लागताच व्यक्ती लागला चालायला दुसरी डोज घेण्यासाठी तो स्वत: सायकल चालवत पोहोचला निराश झालेले डॉक्टर आणि कुटुंबातील सर...

  • कोव्हीशील्डचा पहिला डोज लागताच व्यक्ती लागला चालायला
  • दुसरी डोज घेण्यासाठी तो स्वत: सायकल चालवत पोहोचला
  • निराश झालेले डॉक्टर आणि कुटुंबातील सर्व सदस्य ही झाले स्तब्ध
  • सर्व नागरिकांना लस घेण्याचे केले आव्हान.....

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स

गेल्या अडीच वर्षांपासून एका व्यक्तीला पायात सूज व अर्धांगवायूमुळे चालणे अशक्य झाले होते. त्याला कोरोना लसीचा डोस होताच तो काही दिवसातच चालू लागला. लस लावल्यावर झालेला हा बदल पाहिल्यानंतर डॉक्टरांसह कुटुंबातील सदस्यही स्तब्ध झाले. असे सांगितले जात आहे की, छत्तीसगढ राज्यातील अंबिकापुर जवळ ग्राम पंचायत पलका चे सरनापारा येथे राहणारे संधू राम सोरी वडील घासीराम यांना गुडघ्याखालील पायात सूज आणि अर्धांगवायू मुळे गेल्या अडीच वर्षापासून चालता ही येत नव्हते. तो आपला पूर्ण वेळ पलंगावर घालवत होता. उपचार करूनही प्रकृती सुधारली नाही तेव्हा रुग्ण तसेच कुटुंबातील सदस्य ही निराश झाले होते. कुटुंबातील सदस्यांनुसार, कोविशिल्डचा लसचा पहिला डोज लागल्यावर त्याच्या तबेतीत वेगाने सुधारणा झाली आणि तो पलंगावरुन उभा राहिला. त्याने फक्त 6 दिवसांत चांगले चालणे सुरू केले आणि 22 जून रोजी त्यांनी स्वत: सायकल चालवून कोविशिल्डचा दुसरा डोस मिळविण्यासाठी केंद्रावर पोहोचला. दुसरी लस मिळाल्यानंतर संधूराम सोरी यांनी सांगितले की कोविशल्डची लस त्यांच्यासाठी वरदान असल्याचे सिद्ध झाले. ज्या आजारामुळे तो गेली अडीच वर्षांपासून असहाय्य होता, त्या रोगांना लसीच्या डोजने दूर केले. त्याच्या प्रकृतीबद्दल  आता कुटुंबातील सदस्यही आणि डॉक्टरही दंग आहेत. गावतिल सर्व नागरीकानी लसीकरणात सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. ही लस कोरोनापासून बचाव करण्यासाठीच फायदेशीर ठरत नाही तर बर्‍याच रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता देखील देते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. सदर लकवा ग्रस्त व्यक्तीवर लसीचा झालेला परिणाम बघता इतर लकवा ग्रस्त व्यक्तीवर लसीचा वापर करून संशोधन केले पाहिजे.

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top