Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपुर जिल्ह्यात दारूविक्रीचे परवाने एक जुलैपासून मिळणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अडचणींच्या कचाट्यात मद्यविक्रीचे परवानाधारक दारूविक्री परवाना नूतनीकरणाच्या कामाची प्रक्रिया सुरू मागील १४ दिवसांत २१६ अर्ज ८८ अर्जांवर लवकर...

  • अडचणींच्या कचाट्यात मद्यविक्रीचे परवानाधारक
  • दारूविक्री परवाना नूतनीकरणाच्या कामाची प्रक्रिया सुरू
  • मागील १४ दिवसांत २१६ अर्ज
  • ८८ अर्जांवर लवकरच निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात दारूविक्री परवाना नूतनीकरणाच्या कामाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मागील १४ दिवसांत २१६ अर्ज आले असून त्यातील ८८ अर्जांवर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. परिणामी दारूविक्रीचे परवाने येत्या एक जुलैपासून मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत.

जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ नंतर दारूबंदी लागू करण्यात आली होती. दारूबंदी उठविण्याचा निर्णय २७ मे २०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे सहा वर्षानंतर जिल्ह्यातील दारूबंदी उठली आहे. जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय झाल्यावर उत्पादन शुल्क विभागाने ११ जून रोजी परिपत्रक जारी केले. त्यामुळे ३१ मार्च २०१५ पर्यंत परवानगी असलेल्या दारूविक्री परवानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले. दारूविक्री परवानाच्या नूतनीकरणाबाबत चंद्रपूर, वरोरा आणि राजुरा येथे अर्ज स्वीकारले जात आहेत. आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाकडे दारूविक्री परवानाच्या नूतनीकरणाबाबत २१६ अर्ज आले होते. त्यातील १२४ अर्जांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी ८८ प्रकरणावर निर्णय घेतला जाणार असून त्यात किती मंजूर होतील याबाबत जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत प्रक्रिया पूर्ण केली जात असून १ जुलैपासून परवाने वाटप केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा एका अधीक्षकांनी सांगितले कि, उर्वरित प्रकरणात काहींच्या बाबतीत तक्रारी आहेत. त्यांची चौकशी होऊन निर्णय घेतला जाणार आहे. काही प्रकरणात मूळ परवानाधारकांचा मृत्यू झाला आहे, मग नातेवाईकांना अर्ज करावा लागतो, त्याची पडताळणी करावी लागणार आहे. काही प्रकरणात मनपाने त्रुटी दाखल पत्र दिले आहे. विक्रीकर विभागाची थकबाकी असल्यानेही काही प्रकरणे चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. विविध प्रकरणात बार, देशी दारूची दुकाने, बियर शॉपी यांचा यात समावेश असून त्यात बारचे प्रमाण अधिक आहे.

अडचणींच्या कचाट्यात मद्यविक्रीचे परवानाधारक
दारूबंदी लागू होण्यापूर्वी सुमारे ५१४ मद्यविक्रीचे परवानाधारक होते. तूर्त अर्जांची संख्या त्या तुलनेत बरीच कमी दिसत आहे. काहींनी जागा विकली आहे. काहींचा भाडेकरार संपुष्टात आला, यासह काही अडचणी असल्याची बाब समोर आली आहे.

बातम्या अधिक आहेत......

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top