Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: थरार! प्रियकराने कापला प्रेयसीचा गळा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कापलेल्या गळ्यासह दुचाकीवर बसून गेली रुग्णालयात आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - प्रियकराने प्रेयसीवर चाकूने गळा कापत जीवे मारण्याचा प्...

  • कापलेल्या गळ्यासह दुचाकीवर बसून गेली रुग्णालयात

आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
प्रियकराने प्रेयसीवर चाकूने गळा कापत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडीस आली आहे. नागपूर शहरात गेल्या आठवड्यात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतांना आज हा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

२० वर्षीय प्रेयसी या हल्यात जखमी झाली असून प्रताप दमके वय २१ असे हल्लेखोर प्रियकराचे नांव आहे. या घटनेप्रकरणी इमामवाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून निखिलचा शोध सुरु केला आहे. 

निखिल व त्याची प्रेयसी यांच्या बरेच दिवसापासून सूत जुळले होते. निखिल हा गॅरेजमध्ये काम करीत होता. मात्र लॉकडाऊन मुळे त्याचे काम गेले. त्यानंतर त्याने पानठेल्यावर खर्रा घोटण्याचे काम सुरु केले. त्याला दारूचे व्यसन सुद्धा होते. त्याची प्रेयसीसुद्धा एका जागी काम करायची. दोघांची जवळीक वाढत गेली त्यानंतर निखिलने लग्नाची मागणी केली. प्रेयसीनेपण लग्नास होकार दिला मात्र तिच्या कुटुंबियांना या दोघांचे नाते मान्य नव्हते. त्यानंतर निखिलने पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर हे दोघे दुसऱ्या भागात राहायला गेले. 

घरातील आर्थिक चनचनीमुळे दोघांमध्ये वाद व्हायला लागले. प्रेयसीशी वाद घातल्यानंतर मारझोड सुरु केली. त्यामुळे कंटाळून प्रेयसी माहेरी राहायला गेली. पण निखिल हा आईला सुद्धा त्रास देऊ शकतो म्हणून ती भाड्याने खोली घेऊन राहत होती. निखिल तिथेही तिच्या सोबत वाद घालायचा व मारहाण करायचा. या सर्वप्रकाराला कंटाळून प्रेयसीने इमामवाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली. पोलिसात तक्रार दिल्यामुळे निखिल आणखीनच चिडला त्यानंतर या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यातूनच निखिलने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करत चाकूने गळा कापला. तिने आरडाओरड केली त्यामुळे निखिल पसार झाला. जखमी अवस्थेत प्रेयसीने मैत्रिणीशी मोबाईलवर संपर्क साधला आणि घरी बोलाविले. मोपेडवर ती मैत्रिणीसोबत मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेली डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

बातम्या अधिक आहेत.....

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top