- अवैध रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर जप्त
सावली -
सावली तालुक्यातील हरांबा साजा येथील पटवारी झिटे यांनी रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सदर कार्यवाही दि. २७ एप्रिल ला पटवारी झिटे हे हरांबा येथे आल्यानंतर त्यांची ही पहिलीच कारवाई आहे.
कोरोनामुळे राज्यात जिल्हाभरात संचारबंदी व लॉकडाऊन चालु असल्यामुळें सर्व प्रशासकीय यंत्रणा कामात लागली आहे. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी आपल्या गोरखधंदाला सुरुवात केली. या तस्करीबद्दल पटवारी झिटे यांना महिती लागली. त्यांनी पहाटेच्या सुमारास साखरी या गावाजवळ रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहे. तर पुढील कारवाई तहसील प्रशासन करणार असल्याचे म्हंटले जात आहे.
एकाच महिन्यात 617 कोरोनाचे बळी!
उत्तर द्याहटवाजिल्ह्यासाठी एप्रिल ठरला मरण काळ,
शहरात सर्वाधिक मृत्यू
एप्रिल महिन्यात झालेल्या 617 मृत्यू मध्ये 55 वर्षा वरील महिला तसेच पुरुषांचे प्रमाण हे अधिक आहे.
यामध्ये 393 पुरुषांचा तर 224 महिला मृतकांचा समावेश आहे.
जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत यवतमाळ शहरात मृत्यूचे प्रमाण हे प्रचंड असून तब्बल (दोनशे त्रेचाळीस) मृत्यू हे एकट्या यवतमाळ तालुक्यात झाले आहे.