Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नळाला टिल्लू पंप लावल्यामुळे पाणी मिळेना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडले ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष विर पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी (ग्रामीण) राजुरा - राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र कोरो...

  • पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडले ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

विर पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी (ग्रामीण)
राजुरा -
राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे, मात्र जिल्ह्यातील काही गावे तहानेने व्याकूळ झालेली असून त्यांना कोरोनापेक्षा पाणीटंचाईचे संकट मोठे वाटत आहे. घोटभर पाण्यासाठी अनेक गावांचा आटापिटा चाललेला आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करताना दिसत आहेत. तालुक्याच्या मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर वसलेल्या माणोली बूज ग्रामपंचायत मधील सुमारे २५० कुटुंबांच्या लोकवस्तीचे बाबापूर या गावात पाणी टंचाईची समस्या आता उग्र बनली असून गावातील काही नागरिक नळ योजनेने दिलेल्या नळाला पाणी पंप (टिल्लू पंप) जोडून पाणी घेत आहे.

त्यामुळे जलकुंभातील पाण्याची धाव त्या लावलेल्या पंपा कडे होत असल्याने गावातील नागरीकांना पाण्याचा तुटवडा भासत आहे. तरी ही ग्रामपंचायत माणोली बूज यांचे या गंभीर प्रकरणी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

गांवातील नागरिकांनी त्या पंप धारकांना वारंवार कान उघाडणी करून देखील त्यांच्यात काळी मात्र बदल पडला नाही या मुळे बाबापूर गावात पंप जोडणी केलेल्या नागरिकांनबद्दल आक्रोश निर्माण होत आहे. ग्रावकऱ्यानी ग्राम पंचायतीला टिल्लू पंप लावून पाणी खेचणाऱ्या नळ धारकांचे नळ कनेक्शन खंडित करत दंड वसूल करून पंप जप्त करण्याची मागणी केली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top