आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २० फेब्रुवारी २०२४) -
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात जगभर साजरी करण्यात येते. चौका-चौकात शिवरायांची जयंती निमित्य ढोल-ताशे व डीजेच्या गजरात मिरवणुकही काढली जाते परंतु घरगुती शिवरायांची जयंती साजरी होतांना क्वचितच आढळते. अशीच एक शिव जयंती राजुरा तालुक्यात धोपटाळा येथे साजरी करण्यात आली.
कु.ओजस्वी व चि.रेहांश हे 5 व 6 वर्षांचे चिमुकले, लहानपणापासुनच त्यांचे आई-वडील शिवजयंती निमीत्त त्यांना चौकात घेवुन जायचे व जन्मोत्सवात सहभागी व्हायचे. स्थानिक व्यवसायीक ग्लोबल ग्राफिक्सचे संचालक गजानन तपासे व त्यांची अर्धांगिनी सौ. राजश्री गजानन तपासे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली आणि आपल्या चिमुकल्यांसोबत छत्रपतींचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आपल्या घरी साजरा केला.
सकाळीच दारासमोर शेणपाण्याचा सडा टाकुन, दारावर आंब्याच्या पानाचे तोरण बांधली, अंगणात भगवा पताका व घरावर भगवा झेंडा लावण्यात आला. कु. ओजस्वी व चि. रेहांश यांनी आपल्या वार्डातील मित्र - मैत्रिणींना घरोघरी जावुन शिवजन्मोत्सवाला घरी यायचं आमंत्रण दिलं. सगळे चिमुकली मंडळी एकत्रित आपल्यानंतर सर्वप्रथम शिवरायांच्या मुर्तीला पुष्पामाला अर्पण करुन शिवरायांच्या नावाचा जयघोष करण्यात करत मुलांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शिवरायांबद्दल थोडक्यात माहीती देवुन मुलांचे डॉन्स घेवुन मुलांचा आनंद व्दिगुणीत करण्यात आला व शेवटी मुलांना उपहार देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी माँसाहेब जिजाऊंच्या भुमिकेत कु. ओजस्वी गजानन तपासे व कु. माही सुरज पिंपळशेंडे तर शिवरायांच्या भुमीकेत चि. रेहांश चंद्रकांत तपासे ही चिमुकले सर्वांचे लक्ष वेधुन घेत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री. चंद्रकांत तपासे, सौ. प्रिती तपासे, सौ. पुजा सुरज पिंपळशेंडे यांची मोलाची मदत लाभली. (aamcha vidarbha) (rajura)
Advertisement

Related Posts
- कढोली बुज गाव हादरलं; ३० वर्षीय तरुणाची नदीत उडी29 Jul 20250
कढोली बुज गाव हादरलं; ३० वर्षीय तरुणाची नदीत उडीपोलीस आणि गावकऱ्यांची संयुक्त शोधमोहीम सुरूच!राजुरा ...Read more »
- आदिवासी मंत्र्यावर अवमानकारक भाष्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी28 Jul 20250
आदिवासी मंत्र्यावर अवमानकारक भाष्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीआमचा विदर्भ - दीपक शर्माराजु...Read more »
- "राजुरा न.प. शिक्षण परिषदेला यशाचा सन्मान!"26 Jul 20250
"राजुरा न.प. शिक्षण परिषदेला यशाचा सन्मान!"विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाचा आदर्श उपक्रमआमचा विदर्भ - दी...Read more »
- "आदिवासी तरुणाचा प्रण: यश न मिळेपर्यंत दाढी-केस नाही कापणार!"26 Jul 20250
"आदिवासी तरुणाचा प्रण: यश न मिळेपर्यंत दाढी-केस नाही कापणार!"सात वर्षांचा प्रण पूर्ण करणारा ''सूरज''...Read more »
- भेंडाळा-चिचबोडी रस्त्यावरील पूल वाहून गेला, नागरिकांचा संताप25 Jul 20250
भेंडाळा-चिचबोडी रस्त्यावरील पूल वाहून गेला, नागरिकांचा संतापआमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (...Read more »
- संततधार पावसाने रस्त्यावरच पूर, नागरिक घरात कैद24 Jul 20250
संततधार पावसाने रस्त्यावरच पूर, नागरिक घरात कैदघरे-रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीततुकूम-शास्त्रीनगर जलमय...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.