Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "आदिवासी तरुणाचा प्रण: यश न मिळेपर्यंत दाढी-केस नाही कापणार!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"आदिवासी तरुणाचा प्रण: यश न मिळेपर्यंत दाढी-केस नाही कापणार!" सात वर्षांचा प्रण पूर्ण करणारा ''सूरज'' आमचा विदर्भ ...
"आदिवासी तरुणाचा प्रण: यश न मिळेपर्यंत दाढी-केस नाही कापणार!"
सात वर्षांचा प्रण पूर्ण करणारा ''सूरज''
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २६ जुलै २०२५) -
        चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चनाखा येथील युवक व शारीरिक शिक्षक सूरज किशोर मडावी याने घेतलेल्या सात वर्षांच्या प्रामाणिक प्रणाची पूर्णता केली आहे. आपल्या शिक्षणप्रवासात विविध अडचणींवर मात करत सूरजने एक निर्णय घेतला होता — तोपर्यंत दाढी व केस कापणार नाही, जोपर्यंत जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होत नाही. आज तो अकोला येथे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत असून, आता त्याने आपले केस व दाढी कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

        (suraj madavi) सूरज मडावी याचा प्रवास हा अनेक अडचणी, संघर्ष आणि प्रेरणांचा आहे. पदवी – B.Com, M.Com, B.Ed, B.PEd, M.PEd सुरज आदिवासी समाजातील असून, घरची परिस्थिती हलाखीची, आई-वडील शेतमजूर. शिक्षणासाठी उन्हात काम, फोड पडलेले हात आणि तरीही जिद्द ठेवून शिक्षण पूर्ण केलं. नागपूरच्या RTM कॅम्पसमधून M.PEd पूर्ण केल्यानंतर अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. शेवटी अकोला येथे शारीरिक शिक्षक म्हणून निवड झाली.

        या प्रवासात फोटो स्टुडिओ काम, मोलमजुरी, मजदुरी, शेळी पालनात नुकसान, मेडिकलमधून रिजेक्ट या सगळ्यांतून सावरत, आपल्या जिद्दीने तो यशाकडे पोहोचला. याच संघर्षातून प्रेरणा घेत सूरजने कॅन्सर रुग्णांसाठी आपल्या सात वर्षे वाढवलेल्या दाढी व केशदानाचा निर्णय घेतला.


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top