Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आदिवासी मंत्र्यावर अवमानकारक भाष्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आदिवासी मंत्र्यावर अवमानकारक भाष्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २७ जुलै २०२५) -         पुणे ज...
आदिवासी मंत्र्यावर अवमानकारक भाष्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २७ जुलै २०२५) -
        पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे लोकप्रतिनिधी यांनी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्याबाबत आढावा बैठकीदरम्यान अपमानकारक व अर्वाच्य शब्दांचा वापर केल्याचा आरोप करत, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा राजुरा तर्फे राजुरा पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महा सचिव महीपाल मडावी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन सिडाम, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पी. आत्राम व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय आदिवासी विकास परिषदेने या घटनेचा निषेध करत दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात आली.

निवेदनाचा विषय:
        “आदिवासी मंत्र्याचा अवमान म्हणजे संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान आहे. संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अशा भाषेचा वापर हा निषेधार्ह असून, त्याविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top