Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "सेवा दिवस" निमित्त भव्य समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"सेवा दिवस" निमित्त भव्य समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवशी उपक्रमांचा शुभारंभ आमचा विदर्भ - दीपक शर्मा...
"सेवा दिवस" निमित्त भव्य समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवशी उपक्रमांचा शुभारंभ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २७ जुलै २०२५) -
        आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा दिवस" म्हणून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात विविध आरोग्यवर्धक व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमात कॅन्सर निदान शिबिर. नेत्रतपासणी व मोतीबिंदू निदान, वयोश्री योजनेअंतर्गत श्रवणयंत्र, व्हील चेअर, काठी, पट्टे आदी सहाय्यक साहित्य वितरण, रक्तदान शिबिरे, महाआरती व सामूहिक प्रार्थना, कामगारांसाठी धनुर्वात प्रतिबंधक इंजेक्शन. विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप ही शिबिरे डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सामाजिक बांधिलकीतून व प्रेरणेतून आयोजित करण्यात आली आहेत.

        या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, चंदनभैय्या चंदेल, प्राध्यापक अतुल देशकर, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, संध्याताई गुरनुले, विवेक बोढे, राहुल पावडे, राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, महेश देवकाते, विशाल निंबाळकर, रामपाल सिंग, सविता कांबळे, नम्रता ठेमसकर, किरण बुटले, सुरज पेदुलवार, प्रज्वलन कडू, राजीव गोलीवार, धनराज कोवे, धम्मप्रकाश भस्मे, श्रीनिवास जंगमवार, रणजयसिंग, उमेश आष्टणकर, अमित निरंजने, होमेश्वर नंदनवार, गणेश रामगुंडेवार, निलेश पझारे व समस्त भाजपा पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top