कढोली बुज गाव हादरलं; ३० वर्षीय तरुणाची नदीत उडी
राजुरा (दि. २९ जुलै २०२५) –
तालुक्यातील कढोली बुज येथील ३० वर्षीय दीपक बोबडे या युवकाने वर्धा नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना रविवारी (२८ जुलै) संध्याकाळी घडली. सध्या पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम सुरू असून दीपक अद्यापही बेपत्ता आहे. पोलीस निरीक्षक अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम राबविण्यात येत असून पोलीस हवालदार संदीप मेश्राम, शिपाई गणेश मडावी, शिपाई मंगेश वानखेडे, शिपाई अतुल बन्सोड, शिपाई वैभव ठाकरे, तसेच स्थानिक पोहणारे व स्वयंसेवक मदतीस उतरले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक बोबडे हा कढोली बुज येथे टायर पंचरचे काम करत होता. रविवारी संध्याकाळी त्याने वर्धा नदीत उडी घेतली. त्याने नदीत उडी का घेतली हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ पोलीसांना कळवले. रात्रभर अंधार आणि पाण्याच्या प्रवाहामुळे शोधमोहीमेत अडथळे आले. आज सकाळपासून शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आले असून पोलीस सतर्कतेने काम करत आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.