किशोर कुलकर यांची अध्यक्षपदी, सुनिल रामटेके यांची उपाध्यक्षपति तर लक्ष्मीकांत मासीरकर यांची सचिवपदी नियुक्ती
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २० फेब्रुवारी २०२४) -
विदर्भ पटवारी संघ नागपूर, उपविभाग शाखा राजूरा ची वार्षिक आमसभा दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थानिक पटवारी भवन येथे अध्यक्ष किशोर कुलकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश सुर्वे, अध्यक्ष वि.प. संघ जिल्हा शाखा चंद्रपूर, धनराज पारसे उपाध्यक्ष, सुनील चौधरी, धनराज बुराडे, दिगांबर गेडाम, किशोर उईके मंडळ अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी राजूरा उपविभाग कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात किशोर एस. कुलकर यांची अध्यक्षपदी, सुनिल रामटेके उपाध्यक्ष, लक्ष्मीकांत मासीरकर सचिव, परवेझ शेख सहसचिव, दामोधर शेंडे कोषाध्यक्ष, सदस्य - किशोर उईके, प्रकाश कमलवार, सागर कोडापे, प्रविण गंधमवार, विलास चिने, दिगांबर वडस्कर यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. कार्यक्रमाचे संचालन सागर कोडापे तर आभार किशोर उईके यांनी केले. (aamcha vidarbha) (rajura)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.