आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०५ डिसेंबर २०२५) –
औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात कामगारांच्या हक्कांवरून कंपनी प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये वाढत्या तणावाला नवीन वळण मिळाले आहे. भारतीय मजदूर संघाचे जिल्हा मंत्री पवन ढवळे यांनी कंपनी व्यवस्थापनांना तीव्र शब्दांत इशारा देत कामगार आयुक्तांच्या आदेशाला दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार भवनात झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवन ढवळे म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. त्यामुळे कामगारांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनावर तसेच कंपनी व्यवस्थापनावर तितकीच आहे. मात्र अनेक वेळा कामगार आयुक्तांनी बोलावलेल्या संयुक्त बैठकींना कंपनी व्यवस्थापन मुद्दाम अनुपस्थित राहते, ज्यामुळे कामगार आयुक्तांचा तसेच कामगार वर्गाचा अपमान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे, बैठकीला न येणे आणि मुद्दाम विलंब करवून कामगारांच्या न्याय प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे हे गंभीर आहे. या वर्तनामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष वाढत आहे आणि त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत जाणूनबुजून अडथळा निर्माण केला जात आहे.
पवन ढवळे यांनी इशारा दिला की, जर पुढील काळातही कंपनी व्यवस्थापनांनी अशाच प्रकारे बैठकींना गैरहजर राहणे, आदेश पाळण्यात निष्काळजी वृत्ती ठेवणे सुरूच ठेवले तर भारतीय मजदूर संघ चंद्रपूर जिल्हा शाखा मोठ्या आंदोलनाची भूमिका घेणार आहे. कामगारांच्या प्रश्नांवर सतत अडथळा आणणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई न झाल्यास कामगारांना रस्त्यावर उतरावे लागेल, अशीही चेतावणी त्यांनी दिली.
#LabourRights #WorkersJustice #TradeUnionVoice #ChandrapurIndustry #BMSEfforts #WorkersUnity #FightForJustice #CorporateAccountability #LabourCommissioner #IndustrialNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.