दोन वर्षांसाठी राज्य नेतृत्व निवड; सागर तायडे अध्यक्षपदी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०५ डिसेंबर २०२५) –
स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र येथे राज्य कार्यकारिणी, सर्व जिल्हा शाखा व संलग्नित संघटनांची संयुक्त सर्वसाधारण सभा राज्याध्यक्ष सागर तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष एन. बी. जारोंडे आणि विकास गौर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सभेमध्ये संघटनेच्या आगामी दोन वर्षांच्या धोरणात्मक दिशेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी कामगारांच्या हक्कांसाठी संघटनेने उचललेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन आगामी काळातील संघर्षनिश्चिती ठरवली. त्यानंतर सभेत सर्वानुमते स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्याच्या नव्या कार्यकारिणीची (सन २०२५-२०२६) निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली -
अध्यक्ष सागर तायडे, उपाध्यक्ष धर्मपाल ताकसांडे, उपाध्यक्ष सुनिल तेलतुंबळे, उपाध्यक्ष प्रशांत रामटेके, उपाध्यक्ष रविंद्र सुर्यवंशी, महासचिव गणेश उके, सहसचिव दिनेश बोरकर, संघटन सचिव देवानंद फुलझेले, संघटन सचिव रत्नपाल डोफे, कोषाध्यक्ष सतिश बागडे, तर सदस्य म्हणून संतोष हेरोडे, गितेश पवार, डी. जी. तायडे, रोहन राठोड, अरून कांबळे, प्रफुल्लता लोणारे आणि सुरेखा अथरगडे यांची निवड करण्यात आली.
नविन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर संघटनेने राज्यातील कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी अधिक प्रभावी लढा उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. आगामी दोन वर्षांत संघटना अधिक सक्षम, एकसंध व संघर्षशील पद्धतीने कामगार प्रश्न हाताळणार असल्याचेही नेतृत्वाने नमूद केले.
#IndependentLabourUnion #WorkersRights #UnionLeadership #MaharashtraLabour #TradeUnionUpdates #LabourMovement #ChandrapurNews #WorkersUnity #UnionElections #LabourVoice #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.