आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०५ डिसेंबर २०२५) –
श्री साईनाथ विद्यालय कढोली (बूज) येथे सन १९९९ च्या दहावीच्या बॅचतर्फे आयोजित रौप्यमहोत्सवी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २५ वर्षांनी पुन्हा एकत्र आलेल्या मित्र–मैत्रिणींमुळे विद्यालयाचा परिसर आनंद, आठवणी आणि भावनांनी भरून गेला.
या स्नेहमिलन कार्यक्रमाची अध्यक्ष सौ. माणुसमारे, मुख्याध्यापिका श्री साईनाथ विद्यालय कढोली (बूज) यांनी तर उद्घाटक म्हणून उपस्थिती अँड. राजेंद्र जेनेकर, माजी विद्यार्थी तथा गुरुदेव प्रचारक यांनी नोंदवली. प्रमुख पाहुणे म्हणून मूत्येलवार सर (सहाय्यक शिक्षक) उपस्थित होते. तसेच सत्कारमूर्ती म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. बोधे सर, तसेच श्री. अस्वले सर, श्री. घटे सर, श्री. बोबडे सर आणि सेवानिवृत्त शिक्षक श्री. वाटेकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे पारंपरिक फेटे बांधून स्वागत करण्यात आले. विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रित परिपाठ घेत शालेय शिस्तीच्या आठवणींना उजाळा दिला. काळाच्या पडद्याआड गेलेल्या सहाध्यायी विद्यार्थ्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
आयोजकांनी मान्यवर व उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन मुख्य स्थळी स्वागत केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. देवराव कोंडेकर यांनी केले तर मैत्रीवर आधारित कविता कु. स्वाती घटे यांनी सादर केली. यानंतर सर्व मान्यवरांचा शाल, सन्मानचिन्ह व ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी ऍडव्होकेट राजेंद्र जेनेकर यांच्या हस्ते विद्यालयाला वर्ष १९९९ च्या बॅचतर्फे स्नेहमिलनाची स्मृतीचिन्ह भेट देण्यात आली. या वेळी सर्व शिक्षकांनी जुने किस्से, आठवणी आणि भावनिक अनुभव सांगितले. २५ वर्षांनंतर झालेल्या भेटीत जुने विद्यार्थीही भूतकाळात रमले. माजी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यालयाशी असलेली नाळ दृढ केली.
उद्घाटक अँड. राजेंद्र जेनेकर यांनी विद्यार्थी जीवन, त्या काळातील शैक्षणिक परिस्थिती आणि गावांमधून ये-जा करण्याच्या संघर्षमय दिवसांची आठवण जागवली. प्रमुख पाहुणे मूत्येलवार सर यांनी सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. माणुसमारे यांनी माजी विद्यार्थी संघ समितीची माहिती देत विद्यालय आणि माजी विद्यार्थ्यांतील समन्वय वाढावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या समितीची अधिकृत घोषणा शाळेच्या शिक्षिका नागरे मॅडम यांनी केली. कार्यक्रमाचे संयोजन कु. स्वाती घटे व लक्ष्मीकांत कोराटे यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश पेटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाले.
शेवटी सर्व शिक्षक व माजी विद्यार्थी यांनी एकत्रित छायाचित्र काढले व स्नेहभोजनाचा आस्वाद घेत एकमेकांना निरोप दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवराव कोंडेकर, प्रविण जेनेकर, संजय बोबडे, गणेश पेटकर, अंतिम हिंगाने, लक्ष्मीकांत कोराटे, अर्चना ढुमने, वसुंधरा अडवे, स्वाती घटे, दिलीप भोयर आणि मारोती कोंगरे यांनी परिश्रम घेतले.
#AlumniMeet #SilverJubileeBatch #SchoolMemories #SainathVidyalaya #EducationNews #AlumniReunion #FriendsForever #ChandrapurUpdates #SchoolLife #1999Batch #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.