आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०६ डिसेंबर २०२५) -
शहरातील श्री राम मंदिर, जुना बस स्टॉप परिसरात रोटरी क्लब राजुरा यांच्या वतीने 22 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सहादिवशीय ॲक्युप्रेशर शिबिर तथा फिजिओथेरपी कॅम्प आयोजित करण्यात आला. शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून उपचार घेतल्याने शिबिराला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात पाठदुखी, सांधेदुखी, मान दुखणे, जुनाट वेदना, स्नायूंचे ताण, नर्व्ह संबंधित त्रास आदी विविध व्याधींवरील उपचार ॲक्युप्रेशर तज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून करण्यात आले. अनेक नागरिकांनी आपले अनुभव सांगताना जुनाट व्याधींचा त्रास कमी झाल्याचे समाधान व्यक्त केले. शिबिरात उपलब्ध उपचारांसोबत गरजेनुसार उपाय साहित्यही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले. शिबिराचा आढावा घेताना नागरिकांनी सांगितले की असा आरोग्यदायी उपक्रम परिसरात नियमित व्हायला हवा. रोटरी क्लब राजुरा यांनी घेतलेल्या या सामाजिक पुढाकाराबद्दल त्यांनी क्लब पदाधिकारी व टीमचे मनापासून आभार मानले.
या शिबिरासाठी रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष निखिल चांडक, सचिव राजू गोखरे, माजी अध्यक्ष नवल झंवर, कमल बजाज, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी वारकड, वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे चे मायनिंग मॅनेजर ओमप्रकाश गुप्ता, गोपाल राव, कोषाध्यक्ष अभिषेक गंपावार, सहसचिव विनोद चन्ने, उपाध्यक्ष अमजद खान, सदस्य अँड. जगजीवन इंगोले, अहमद शेख, किशोर हिंगाणे, किरण ढुमणे व संपूर्ण रोटरी क्लब राजुरा टीम उपस्थित होती. त्यांच्या सहकार्याने, समन्वयाने आणि अथक परिश्रमाने सहादिवशीय कॅम्प उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य जनजागृतीसाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार रोटरी क्लबने व्यक्त केला.
#RajuraHealthCamp #RotaryClubRajura #AcupressureCamp #PhysiotherapyCamp #CommunityHealth #PublicService #WellnessInitiative #HealthcareSupport #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.