आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०९ डिसेंबर २०२५) -
जिल्ह्यातील अवैध गौवंश वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी मोठी कारवाई करत २० गौवंशीय बैलांची सुटका केली असून दोन पिकअप वाहनांसह एकूण २४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या या कारवाईने अवैध कत्तल व्यवसायाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी हद्दीत दोन पिकअप वाहने संशयित स्थितीत जात असल्याचे आढळले. पथकाने वाहनांना अडवून पंचासमक्ष तपासणी केली असता ०६ गौवंश (बैल) कत्तलीसाठी अवैधरित्या वाहून नेताना आढळून आले. त्यानंतर वाहनचालकांची चौकशी केली असता त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी छापा मारण्यात आला. तिथे १४ गौवंश बांधून ठेवलेले आढळले. अशा प्रकारे एकूण २० बैलांची सुटका करण्यात आली. या जनावरांची किंमत अंदाजे ६ लाख रुपये असून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन पिकअपची किंमत १८ लाख रुपये असा एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान आरोपी मिलिंद जितेंद्र कोवे (वय २०, रा. उदापुर, ब्रम्हपुरी) व अफसर अली सय्यद (वय ३३, रा. ब्रम्हपुरी) यांना अटक करण्यात आली. तर एक आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरीमध्ये अपराध क्रमांक ६३६/२०२५ अन्वये कलम ११(१)(घ)(ड)(च)(ज) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, कलम ५(अ), ५(ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सहकलम ४९ भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा जयंत चुनारकर, पोअं. अजीत शेन्डे, नितेश महात्मे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांनी संयुक्तपणे केली.
#IllegalCattleTransport #BramhapuriAction #ChandrapurPolice #CrimeBranchOperation #AnimalRescue #CattleSmuggling #LawEnforcementAction #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.