आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०९ डिसेंबर २०२५) -
तालुक्यातील जेना परिसरात घडलेल्या धाडसी चोरीचा गुन्हा भद्रावती पोलिसांनी अल्पावधीत उघड करत बैलबंडीची लोखंडी चाकं आणि ट्रॅक्टरचे हायड्रोलिक पट्टे परत मिळवले आहेत. या कारवाईत एक पांढऱ्या रंगाची फोर्ड फिगो कारसह एकूण २ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनेची माहिती अशी की, दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी फिर्यादी पंकज राजकुमार देवतळे (वय २९, रा. जेना, ता. भद्रावती) यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातून बैलबंडीची चार लोखंडी चाकं (किंमत १६,००० रु.) तसेच दोन ट्रॅक्टरचे पाच लोखंडी हायड्रोलिक पट्टे (किंमत १०,००० रु.) असा एकूण २६,००० रुपयांचा माल चोरून नेला. तक्रार दाखल झाल्यानंतर तपास पथकाने तांत्रिक तपास, संशयितांची हालचाल, वाहनांची माहिती व गुप्त बातमीदारांच्या साहाय्याने शोध घेत मोठी कामगिरी केली. तपासादरम्यान गुन्ह्यातील मुद्देमालासह चोरीसाठी वापरलेली पांढऱ्या रंगाची फोर्ड फिगो कार क्र. MH34-AM-2618, किंमत २,५०,००० रु. जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण २,७६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला. या प्रकरणात आरोपी विनोद उर्फ बिल्लू देवगडे (वय ५८, रा. आंबेडकर वार्ड, भद्रावती) व आरोपी वैभव महादेव दगडी (वय २९, रा. जेना; ह.मु. महाकाली मंदिर, भिवापूर वार्ड, चंद्रपूर) यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघड करण्यात आला आहे. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५४५/२०२५, कलम ३०३(२), ३१७(२), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा नोंद असून पुढील तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास व कारवाईत पो.उपनि. गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, जगदीश झाडे, अनुप आस्टुनकर, विश्वनाथ चौधरी, गोपाल आतकुलवार, योगेश घाटोळे, रोहित चिडगिरे, खूशाल कावळे, संतोष राठोड (पोलीस स्टेशन भद्रावती गुन्हे शाखा) यांचा सक्रिय सहभाग होता.
#BhadrawatiPolice #TheftCaseSolved #CrimeDetection #StolenPropertyRecovered #PoliceAction #ChandrapurDistrict #LawAndOrder #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.