डॉक्टर मंगेश-कल्पनाची जागतिक लाटांवरील झंकार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १० डिसेंबर २०२५) -
चंद्रपूरचे प्रसिद्ध वैद्यकीय दाम्पत्य डॉक्टर मंगेश गुलवाडे आणि डॉक्टर कल्पना गुलवाडे यांनी दुबईमध्ये पार पडलेल्या ओशन मॅन 2025 या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय समुद्र पोहण्याच्या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत भारताचे आणि चंद्रपूरचे नाव जगभर झळकावले आहे. जगभरातील नामांकित जलतरणपटू सहभागी असलेल्या या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत गुलवाडे दाम्पत्याने ५ किलोमीटर समुद्र पोहण्यात दमदार कामगिरी नोंदवत प्रभावी उपस्थिती नोंदवली.
या आंतरराष्ट्रीय यशानंतर चंद्रपूरमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक सामाजिक, वैद्यकीय आणि क्रीडा संस्थांनी त्यांचे कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ संघटना, इंडियन डेंटल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, आरुषी फाउंडेशन या संस्थांनी त्यांच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि चिकाटीचे विशेष कौतुक केले.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे लोकनेते, माजी मंत्री व माजी पालकमंत्री डॉ. सुधीर मुनगंटीवार यांनी डॉक्टर कल्पना व डॉक्टर मंगेश यांचे अभिनंदन करत “गुलवाडे दाम्पत्याने चंद्रपूर आणि भारताचा अभिमान उंचावला आहे,” अशा भावनिक शब्दांत गौरव केला. तसेच शहरातील अनेक मान्यवरांनीही शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल यशाचा गौरव केला. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये डॉ. रितेश दीक्षित, डॉ. सुश्रुत भुक्ते, डॉ. अशोक वासलवार, डॉ. संजय घाटे, प्रवीण पंत, डॉ. संदीप मुनगंटीवार, डॉ. अभय राठोड, डॉ. रुपेश ठाकरे, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. नगीना नायडू, डॉ. श्वेता मानवटकर, डॉ. मिलिंद दाभेरे, डॉ. राजेश टोंगे, डॉ. प्रवीण घोडे, डॉ. पियुष लोढे, डॉ. किरण देशपांडे, डॉ. प्रमोद बांगडे, डॉ. दीपक भट्टाचार्य, डॉ. शरद रणदिवे, डॉ. नंदकिशोर जोगी, रोटेरियन संदीप रामटेके, रोटेरियन राजेश गणारपवार, रोटेरियन नरेंद्र बोबडे, डॉ. अनुप बांगडे, डॉ. आनंद फुलझेले, डॉ. काशिनाथ गौरक, डॉ. गजेंद्र गणीगर, CA शादाब चिनी, पियुष मेश्राम यांचा समावेश आहे. गुलवाडे दाम्पत्याच्या या उल्लेखनीय आंतरराष्ट्रीय यशाने चंद्रपूरचा गौरव दुणावला असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
#OceanMan2025 #drmangeshgulwade #drkalpanagulwade #ChandrapurPride #IndiaOnGlobalStage #OpenWaterSwimming #InspiringDoctors #DubaiChampionship #TeamIndia #GulwadeCoupleSuccess #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.