आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १० डिसेंबर २०२५) -
रोटरी क्लब राजुरा तर्फे दिनांक 08 डिसेंबर रोजी डिस्ट्रिक्ट 3030 अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ या सामाजिक संकल्पनेतून आयोजित या शिबिराला राजुरा शहरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. संपूर्ण रक्तदान प्रक्रिया शासकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या कडक निगराणीत पार पडली.
शिबिराचे उद्घाटन शासकीय महाविद्यालयाचे डॉक्टर ललित घोंगरे आणि डॉक्टर योगिता माळी यांनी रिबीन फीत कापून केले. उद्घाटनावेळी रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष निखिल चांडक, सचिव राजू गोखरे, माजी अध्यक्ष कमल बजाज, नवल झवर, सारंग गिरसाळवे, कोषाध्यक्ष अभिषेक गंपावार, सहसचिव विनोद चने, सदस्य किरण ढूमणे, ऍडव्होकेट जगजीवन इंगोले, अहमदजी शेख, सुबोध डाहुले, केतन जुनगरी, ऋषभ गोठी, निखिल शेरकी, नितेश गिरडकर, डॉक्टर अमोल कल्लूरवार, आनंद चांडक तसेच मोठ्या संख्येने राजुरावासी उपस्थित होते.
शिबिरात युवकांसह विविध सामाजिक संघटनांच्या स्वयंसेवकांनीही रक्तदान करत समाजाप्रती कर्तव्याची जाणीव दर्शवली. दिवसभर सुरू असलेल्या या शिबिरात लक्षणीय प्रमाणात रक्तसंकलन झाले. रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमांना मिळणारा वाढता पाठिंबा यामुळे आणखी दृढ झाल्याचे आयोजकांनी सांगितले. शिबिराची सांगता सचिव राजू गोखरे यांनी सर्व रक्तदाते, डॉक्टर आणि वैद्यकीय सहकारी टीमचे मनःपूर्वक आभार मानून केली. अशा उपक्रमांमुळे समाजात रक्तदान चळवळीला नवी ऊर्जाशक्ती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
#BloodDonationCamp #RotaryClubRajura #DonateBloodSaveLife #District3030 #CommunityService #RajuraCares #HumanityFirst #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.