आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १० डिसेंबर २०२५) -
साने गुरुजींच्या "खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे" या प्रार्थनेतील मानवतेचा संदेश आजही तेवढाच प्रभावी आहे. रंजल्या-गांजल्यांसाठी प्रेम, सेवा आणि मदतीची भावना जिवंत ठेवत बाळू फाउंडेशन राजुरा तर्फे कुपोषित बालकांना पोषण आहार देण्याची पवित्र परंपरा कायम ठेवण्यात येत आहे. दि. ०९ डिसेंबर रोजी राजुरा येथील शिवसेना चौक परिसरातील अंगणवाडी क्रमांक ८ मधील एका कुपोषित बालकाला बाळू फाउंडेशनच्या ‘कुपोषण पे सिधा वार – हम सब है तैयार’ या उपक्रमांतर्गत पोषण आहाराची बाळू भेट देण्यात आली. हा उपक्रम राजुरा शहरातील प्रतिष्ठित जागरूक नागरिक मिलिंद गड्डमवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला.
या सेवाभावी कार्यक्रमात बाळू फाउंडेशनचे अध्यक्ष अमित महाजनवार, आशीष करमरकर, कल्याणी बावणे, भावना रागीट, वनिता टेकाम, पिंकी कंत्राजवार, आरती रागीट, बाळू फाउंडेशनचे अक्षय सुर्तेकर तसेच अंगणवाडी सेविका दर्शना रागीट उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी कुपोषित बालकांसाठी असा उपक्रम नियमितपणे राबविला जात असल्याचे कौतुक केले तसेच समाजातील सर्वांनी अशा उपक्रमांना हातभार लावावा, असे आवाहन केले. बालकांच्या पोषणात सातत्य आणणे, त्यांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा करणे आणि समाजात जागृती निर्माण करणे या हेतूने बाळू फाउंडेशनचा उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबवला जात आहे. राजुरात हा उपक्रम आता सेवाभावाची ओळख बनत आहे.
#MalnutritionFreeIndia #BaluFoundation #NutritionDrive #RajuraCares #ChildHealth #ServeHumanity #CommunitySupport #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.