स्थानिकांच्या न्यायासाठी सुरज ठाकरे मैदानात
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 08 डिसेंबर 2025) –
जिल्ह्यात बेरोजगार तरुणांच्या सातत्याने होत असलेल्या उपेक्षेच्या पार्श्वभूमीवर जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाची दणक्यात सुरुवात केली आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासह विशेषतः राजुरा विधानसभा क्षेत्रातील स्थानिक तरुणांना किमान प्राथमिकतेने रोजगार देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे; खासदार बदलले, आमदार बदलले… तरीही मागण्या अद्यापही अपूर्णच आहेत. या प्रश्नावर निर्णायक पाऊले उचलण्यासाठी दिनांक 08 डिसेंबर 2025 रोजी सुरज ठाकरे यांनी समस्त बेरोजगार कामगारांना सोबत घेत बल्लारपूर वेकोली येथील व्यवस्थापकांची प्रत्यक्ष भेट घेतली. वेकोली व्यवस्थापक तसेच इतर कंपनी व्यवस्थापकांना स्थानिकांच्या रोजगाराबाबत विस्तृत निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना सुरज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत सांगितले की, नेत्यांना बेरोजगार तरुणांची आठवण फक्त निवडणुकीच्या काळातच होते. मतदानासाठी वापरून झाल्यावर नेता आणि पक्ष सर्वजण तरुणांचा विसर पाडतात. मागे फक्त आश्वासने, आश्वासने आणि फसवणूक… पण ठोस कृती मात्र शून्य. जय भवानी कामगार संघटना गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी झटत आहे. स्वतःच्या ओळखीवर, विश्वासावर आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर संघटनेने अनेक तरुणांना येथे–तेथे नोकरी मिळवून दिली आहे. परंतु तात्पुरत्या संधींनी या प्रचंड समस्येचे निराकरण शक्य नाही. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्रातील सध्याच्या व भविष्यातील सर्व कंपन्या व प्रकल्पांमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्याने रोजगार देणे अनिवार्य करावे, तसेच कंत्राटदारांना काम देताना स्थानिक भरती बंधनकारक करणे आवश्यक आहे, अशी ठाम मागणी यावेळी सुरज ठाकरे यांनी केली.
त्यांनी या मागणीमागील कारणे स्पष्ट करत सांगितले:
- जमीन स्थानिकांची, पण त्रास प्रदूषणाचा आणि पर्यावरणीय ऱ्हासाचा – हा पूर्ण भार स्थानिकांवरच. तरीही रोजगाराच्या संधी परप्रांतीयांना; परिणामी स्थानिक तरुणांना कायम उपेक्षा.
- हे अन्यायकारक असून स्थानिक विकासासाठी स्थानिक तरुणांना प्राधान्य देणे अत्यावश्यक.
- या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास बल्लारपूर वेकोली कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन उभारण्याचा इशारा देखील सुरज ठाकरे यांनी या भेटीत दिला.
या आंदोलनात्मक भेटीप्रसंगी पदाधिकारी, सहकारी व बेरोजगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये निखिल बाजाईत, राहुल चव्हाण, रोहित भत्ताशंकर (युवा शहराध्यक्ष राजुरा), आशिष कुचनकर, शंकर वाढई, सुनील काळे, अयान शेख, आदित्य ढोले, विठ्ठल मोहितकर, आकाश मोहुर्ले, मारुती वाढई, आशिष बावणे, आशिष जाधव, साहिल सय्यद, हर्षल पांडव, बंडू शेलूरकर, स्वप्निल बोबडे, सुरेश वाढइ, रोहित मारशेट्टीवार, शैलेश फुलझले, उमेश भोंगळे, कृष्णा राऊत, गणेश डेंगळे, रितेश येलमुले, श्रीकांत राऊत, कपिल उराडे, रुपेश चिलमे, राजकुमार चौधरी, निखिल येलेलवार, संकेत तिखट, गणेश लांडे, समीर शेख आदींचा समावेश होता.
#LocalYouthFirst #EmploymentRights #SuraThackeray #FightForJobs #ChandrapurUpdates #JayBhawaniUnion #WeWantJobs #SupportLocalWorkers #YouthVoice #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

भाऊ चड्डा माती कंपनी मध्ये तर लोकल कधीच घेत नाहीत आणि आता सध्या त्यांना नवीन साईड पण मिळाले आहे ..
उत्तर द्याहटवा