आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. ०९ डिसेंबर २०२५) -
शहरातील निवडणूक प्रक्रियेभोवती वाढलेल्या संशयाच्या वातावरणात ०८ डिसेंबर २०२५ रोजी बल्लारपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल वाघ यांना निवेदन देत स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याची अधिकृत मागणी करण्यात आली. या निवेदनामुळे शहरातील राजकीय वातावरणाला चांगलाच तडाखा बसला असून मतमोजणीपूर्वी सुरक्षेचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. निवेदनात काँग्रेसतर्फे म्हटले आहे की दि. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले होते. नियमानुसार मतमोजणी दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी व्हायची होती. मात्र दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी मतदान सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने अचानक घेतलेल्या निर्णयानुसार मतमोजणीची तारीख पुढे ढकलून २१ डिसेंबर २०२५ करण्यात आली. या निर्णयानंतर नागरिकांमध्ये मतचोरी, ईव्हीएममध्ये छेडछाड आणि इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ईव्हीएम मशीन हे इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने, तसेच सद्यस्थितीत अनेक ईव्हीएममध्ये अंतर्गत बॅटरी असल्याने उपग्रह, सिग्नल किंवा मोबाईल इंटरनेटद्वारे या मशीनमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो, असा लोकांचा संशय वाढत आहे. त्यामुळे स्ट्राँग रूमचा परिसर कोणत्याही प्रकारच्या वायरलेस किंवा अनधिकृत नेटवर्कपासून पूर्णतः संरक्षित ठेवण्यासाठी जॅमर बसवणे अत्यावश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे. सहायक निवडणूक अधिकारी विशाल वाघ यांनी निवेदन स्वीकारत हा मुद्दा जिल्हाधिकारी यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाठवण्याची ग्वाही दिली आहे.
निवेदन देताना माजी नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, इस्माईल ढाकवाला, तसेच काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या मागणीमुळे आगामी मतमोजणीपूर्वी निवडणूक सुरक्षिततेचा व पारदर्शकतेचा मुद्दा अधिकच गडद झाला असून आगामी काही दिवसांत प्रशासन काय भूमिका घेते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
#BallarpurPolitics #EVMSecurity #devendraarya #StrongRoomSafety #ElectionTransparency #CongressDemand #CountingDay2025 #SecureElections #PublicTrust #JammerForSecurity #DemocracyMatters #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.