आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १२ ऑकटोबर २०२५) -
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी माजी आमदार व प्रख्यात शेतकरी नेते अँड. वामनराव चटप आणि सहकारी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती बोथले यांची भेट घेतली. या प्रसंगी माजी आमदार वामनराव चटप यांनी अध्यक्ष रवी शिंदे यांना ‘ग्रामगीता’ भेट देऊन सत्कार केला.
या भेटीत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल चर्चा झाली. माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी बँकेच्या कार्यप्रणालीचे कौतुक करत, शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी रवी शिंदे आणि त्यांच्या टीमने घेतलेली पुढाकार वृत्ती प्रशंसनीय असल्याचे मत व्यक्त केले. चटप यांनी सांगितले की, सहकार हा ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे बँकेने शेतकरी, शेतमजूर आणि लघुउद्योगिक घटकांसाठी आणखी नव्या योजना राबवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्ष रवी शिंदे यांनी या वेळी सांगितले की, “चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी कल्याणासाठी नेहमीच तत्पर आहे. अल्प व्याजदरावर कर्ज, पिकविमा, महिला स्वयं सहायता गटांना वित्तीय मदत आणि डिजिटल व्यवहार सुलभ करण्याच्या योजनांवर आम्ही सातत्याने काम करत आहोत.” या भेटीदरम्यान सहकारी क्षेत्रातील आव्हाने, शेतकरी हिताच्या योजना आणि बँकेच्या विस्ताराच्या संधींवरही सविस्तर चर्चा झाली. चटप यांनी शिंदे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले.
#ChandrapurBank #Sahakar #FarmersFirst #WamanraoChatap #RaviShinde #ChandrapurNews #CooperativeMovement #FarmersDevelopment #GrameenVikas #MaharashtraAgriculture #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.