Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: राजुरा मतदार यादीचा गोंधळ : काँग्रेस-भाजप दोन्ही पक्ष प्रशासनावर आक्रमक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांचे नाव गायब – प्रशासनाच्या बेपर्वाईवर संतापाचा स्फोट ३१३ मतदार गायब, नागरिकांचा आक्रोश : लोकशाहीला तडा आ...
माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांचे नाव गायब – प्रशासनाच्या बेपर्वाईवर संतापाचा स्फोट
३१३ मतदार गायब, नागरिकांचा आक्रोश : लोकशाहीला तडा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
आमचा विदर्भ (दि. १२ ऑकटोबर २०२५) -
        राजुरा नगर परिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून दिनांक ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. हरकती दाखल करण्यासाठी १३ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असली तरी, यादीत गंभीर अनियमितता, मतदारसंख्येतील तफावत आणि प्रभागनिहाय विसंगती समोर आल्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिक, स्थानिक कार्यकर्ते आणि सर्वच राजकीय पक्षांनी प्रशासनाच्या बेपर्वाईवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.

        राजुरा येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसने प्रशासनाविरोधात तीव्र आक्षेप नोंदवला. माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांनी सांगितले की, “मी ३५ वर्षांपासून नगरसेवक आहे. मी माझे नाव वगळण्याची कोणतीही विनंती केली नसतानाही माझे नाव मतदार यादीतून गायब आहे! हे केवळ अनियमिततेचे नव्हे तर लोकशाही प्रक्रियेवर झालेल्या थेट हल्ल्याचे उदाहरण आहे.” देशपांडे पुढे म्हणाले, “मी प्रत्येक लोकसभा, विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकीत मतदान केले आहे. मात्र या यादीत माझे नाव नाही आणि वगळलेल्या मतदारांच्या यादीतही नाही. एवढंच नव्हे, माझ्या दोन मुलींची नावे वगळण्यासाठी मी अर्ज केला तरी ती कायम ठेवली आहेत. हा प्रकार नागरिकांवर आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर घाव घालणारा आहे.” त्याचवेळी काँग्रेसचे रवी त्रिशुलवार यांच्या नावाची चार वेगवेगळ्या ठिकाणी नोंद झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

        माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी प्रशासनावर हल्लाबोल करत म्हटले की, “२०२४ च्या विधानसभेत सक्रिय असलेले अनेक मतदार या यादीतून वगळले आहेत. काही संभाव्य उमेदवारांची नावे गायब आहेत. ही बाब मतदानाधिकारावर गदा आणणारी आहे. प्रभागनिहाय चुकीच्या नोंदीमुळे अनेकांना त्यांच्या मूळ प्रभागात मतदान करता येणार नाही. हे थेट लोकशाहीची थट्टा आहे!”

गंभीर आकडेवारी – मतदारसंख्येतील ३१३ मतदारांचा फरक
        २०२४ साली नगर परिषदेची मतदारसंख्या २६,०२५ होती. १ जुलै २०२५ पर्यंत ६३६ नवीन नावे आणि ४८ वगळणी झाल्याने एकूण २६,६१३ मतदार असणे अपेक्षित होते. मात्र प्रारूप यादीत फक्त २६,३०० मतदार दाखवले गेले असून तब्बल ३१३ मतदारांचा फरक आढळतो. याशिवाय प्रत्येक प्रभागातील २०० पेक्षा अधिक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. उदा. - प्रभाग क्रमांक १ चे मतदार प्रभाग क्रमांक ५ किंवा ६ मध्ये दाखल झाले. परिणामी मतदारांना त्यांच्या मूळ प्रभागातील नगरसेवकासाठी मतदान करता येणार नाही.

निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली
        राज्य निवडणूक आयोगाने ३० सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मतदार यादीसाठी cut-off date १ जुलै २०२५ निश्चित केली आहे. २०२४ च्या विधानसभा मतदार यादीच ग्राह्य धरायची, असे स्पष्ट नमूद आहे. मात्र, नगर परिषद प्रशासनाने या नियमांकडे दुर्लक्ष करून अव्यवस्थित व गोंधळलेली यादी जाहीर केली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेसचा इशारा – “चुका न सुधारल्यास रस्त्यावर आंदोलन”
        “प्रशासनाने जबाबदार अधिकारी विरुद्ध चौकशी करून तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरू.” असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेत राजुरा विधानसभा काँग्रेस समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष हरजीतसिंग संधु, जिल्हा महासचिव एजाज अहमद, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, आनंद दासरी, रवी त्रिशुलवार, संतोष गटलेवार, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अनंता ताजने, हेमंत झाडे आदी उपस्थित होते.

भाजपचाही आघात – मतदार यादीवर घरोघरी चौकशी करा
        मतदार यादीतील गोंधळावर भारतीय जनता पार्टी राजुरा शहर शाखेनेही प्रशासनावर हल्ला चढवला. शहराध्यक्ष सुरेश रागीट, शहर महामंत्री मिलिंद देशकर, माजी नगरसेवक राधेश्याम अडाणीया आणि युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रफुल्ल घोटेकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.

        भाजपने म्हटले की, “एका घरातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात नोंदवली गेली आहेत. हा गंभीर प्रकार आहे. प्रशासनाने घरोघरी जाऊन तपासणी करून फेरमतदार यादी तयार करावी.”

लोकशाही धोक्यात – दोन्ही पक्ष एकाच भूमिकेत
        राजुरा शहरात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रशासनावर केलेल्या तीव्र टीकेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांचाही सूर स्पष्ट आहे – “मतदार यादीतील गोंधळ दुरुस्त करा, अन्यथा निवडणूकच संशयाच्या भोवऱ्यात जाईल.”

#RajuraElections2025 #VoterListError #RajuraPolitics #DemocracyUnderThreat #VoterRights #ChandrapurNews #CongressVsAdministration #BJPVoice #TransparencyInElections #RajuraMunicipalPolls #SaveDemocracy #congress #BJP #anurdhote #sunildeshpande #harjitsingh #advchandrasheskharchandekar #shantanudhote #sureshragit #milinddeshkar #radheshyamadaniya #praffulghotekar #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top