आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ११ ऑकटोबर २०२५) -
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी ११ ऑकटोबर ला सकाळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, जेष्ठ काँग्रेस नेते आणि माजी आमदार सुभाष धोटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये आपुलकीचे आणि आत्मीयतेचे वातावरण पाहायला मिळाले. या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. कौशीब खालीद उपस्थित होते. महादेवराव जानकर यांनी सुभाष धोटे यांना सुदृढ आयुष्य आणि दीर्घ राजकीय प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या, तर प्रत्युत्तरादाखल सुभाष धोटे यांनीही जानकर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध सामाजिक, शेतकरी आणि राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या भेटीप्रसंगी अनेक राजकीय कार्यकर्ते आणि समाजप्रेमी उपस्थित होते. त्यामध्ये राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, नगरपरिषदेचे सभापती विकास देवाळकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शंतनू धोटे, काँग्रेस जिल्हा महासचिव एजाज अहमद, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधु, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, धनगर समाजाचे तालुका प्रमुख एकनाथ खडसे, अनंता गोखरे, गोपाल बुरांडे, अभिजीत धोटे, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, तसेच दिपक खेकारे, धनराज चिंचोलकर, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, सय्यद साबिर, उमेश गोरे, प्रणय लांडे, संघपाल देठे यांचा समावेश होता.
राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय
या सदिच्छा भेटीला केवळ शुभेच्छा भेट म्हणून पाहावे की तिच्या माध्यमातून नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होत आहे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. अलीकडच्या काळात भाजपाने बाहेरील नेत्यांना पक्षात सामावून घेणे किंवा युती करणे प्रचलित झाले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला बाजूला सारल्याने, ही भेट राजकीय समीकरण बदलण्याचा संकेत तर नाही ना, अशा चर्चांना उधाण आले आहे.
#MahadeoraoJankar #SubhashDhote #ChandrapurPolitics #RajuraNews #MaharashtraPolitics #PoliticalVisit #CongressLeaders #RSPLeaders #BirthdayMeet #PoliticalDiscussion #VidarbhaNews #ChandrapurUpdates #LeadershipMeet #PoliticalEquation #RajuraUpdate #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha #subhashdhote #arundhote

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.