किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांचा प्रवेश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १२ ऑकटोबर २०२५) -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे शाखेचे उद्घाटन आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा महाकाली कॉलरी, प्रकाश नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात परिसरातील शेकडो युवकांनी राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांने प्रेरित होऊन मनसेचा झेंडा हाती घेत पक्ष प्रवेश केला. कार्यक्रमाचे उद्घाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार तसेच माजी नगरसेवक आणि मनसे शहराध्यक्ष सचिन भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर झालेल्या सभेत दोन्ही नेत्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी या प्रसंगी सांगितले की, “मनसे ही केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक कार्याची संघटना आहे. आम्ही जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर ठामपणे लढा देतो. आज या शाखेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नवा अध्याय सुरू झाला आहे.”
मनसेचे शहराध्यक्ष सचिन भोयर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “चंद्रपूरच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या आवाजाला न्याय देण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एकमेव पर्याय आहे. आपण सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला बळकटी देऊया.”
जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांनी आपल्या वाढदिवशी समाजकार्यातील बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत सांगितले की, “माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक हा माझा परिवार आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हेच माझे ध्येय आहे.”
या कार्यक्रमात मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदणखेडे, मनसे पदाधिकारी मनोज तांबेकर, बल्लारपूर तालुका मनसे महिला सेना अध्यक्षा कल्पना पोर्तलावार, प्रकाश नागरकर, वर्षा बोमले, पोंभूर्णा मनविसे तालुकाध्यक्ष आशिष नैताम, चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष प्रविण शेवते, मनसे रुग्णमित्र क्रिष्णा गुप्ता, मयुर मंदनकर, राजु देवांगण, साहील पठाण तसेच असंख्य मनसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाकाली कॉलरी परिसरात मनसेचा झेंडा फडकताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जय महाराष्ट्र, राजसाहेब ठाकरे अमर राहो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
#MNS #RajThackeray #ChandrapurMNS #KishorMadgulwar #SachinBhoir #RahulBalamwar #Manvase #MaharashtraNavnirmanSena #RajSahabInspires #MNSForDevelopment #ChandrapurYouth #MNSPower #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.