आमदार किशोर जोरगेवार व सुदर्शन निमकर यांच्या हस्ते दानशूर जानबा वडस्करांचा सन्मान
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १२ ऑकटोबर २०२५) -
राजुरा शहरातील वर्धा नदीकाठावरील श्री साईबाबा मंदिर देवस्थान येथे दिनांक १२ ऑक्टोबर २०२५, रविवार रोजी श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात पार पडला. मागील १७ वर्षांपासून सातत्याने साजरा होणाऱ्या या धार्मिक परंपरेला यंदाही हजारो भाविकांनी उपस्थित राहून भक्तिभावाने श्री साईंचे दर्शन घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे सकाळी ६.३० वाजता श्री साईंची काकड आरती घेऊन करण्यात आली. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता श्रींच्या पादुकांचा अभिषेक झाला. सकाळी ९ वाजता श्रींची पालखी आणि मिरवणूक मंदिरापासून वर्धा नदी पलीकडील जलाराम बाप्पा मंदिरापर्यंत नेण्यात आली व पुनश्च साई मंदिरात आगमन झाले. भजन, किर्तन आणि भक्तीगीतांच्या गजरात ही पालखी मिरवणूक भव्य शोभायात्रेत रूपांतरित झाली. दुपारी १२ वाजता मध्यान आरती पार पडली. त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आला. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
दानशूर जानबा पाटील वडस्कर यांचा सन्मान
या उत्सवात चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते, देवस्थानाला लाखो रुपयांची जमीन दान देणारे चुनाळा येथील दानशूर जानबा पाटील वडस्कर यांचा श्री साईबाबा देवस्थान तर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार सुदर्शन निमकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान अध्यक्ष अरुण वाटेकर होते. उत्सवाचे आयोजन श्री साईबाबा देवस्थान बामणवाडा (राजुरा) पालखी महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि कीर्तन सोहळ्याने उत्सवाची शोभा वाढवली
भक्तिमय वातावरणात विविध भजन मंडळांनी सहभाग घेऊन श्री साईंच्या पालखीची शोभा अधिक खुलवली. महाराष्ट्रात गाजत असलेले सत्यपाल महाराजांचे कीर्तन विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संतोष भासावार, अरुण वाटेकर, कृष्णाजी खामनकर, प्रा. संभाजी वरकड, जानबा पाटील वडस्कर, बोबडे गुरुजी, लांडे पाटील, श्रीरंग ढोबळे, मुरली कामिला, विलास चापले, विनोद गुरनुले, लक्ष्मण गुरनुले, राहुल वाटेकर, संजय पावडे, दिलीप श्रीपदवार, राहुल पिल्ले, सुनील चामाटे तसेच श्री साई आरती सेवा मंडळ आणि समस्त साई भक्तांनी परिश्रम घेतले.
#SaiBabaPunyatithi2025 #RajuraSaiMandir #SaiDevotees #KishorJorgewar #SudarshanNimkar #JanbaPatilVadaskar #SaiPalakhi #SaiUtsav #ChandrapurNews #BhaktiFestival #SaiMandirRajura #SaiAartiSevaMandal #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.