Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विधी महाविद्यालय परिसरात २७ वर्षीय युवकाची हत्या; अवघ्या तासाभरात सर्व आरोपी पकडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांची संयुक्त धडक; सहा आरोपी अटकेत आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २३ ऑकटोबर २०२५) -         किरकोळ वादातू...
गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांची संयुक्त धडक; सहा आरोपी अटकेत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २३ ऑकटोबर २०२५) -
        किरकोळ वादातून शहरातील विधी महाविद्यालय समोरील परिसरात २७ वर्षीय युवकाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना २३ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. मृत युवकाचे नाव नितेश वासुदेव ठाकरे वय २७ वर्ष, रा. वार्ड क्र.१, बेताळ चौक, दुर्गापूर असे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख पोस्टे रामनगर हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिसरात सर्वेक्षण करून आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र पथकांची तत्काळ निर्मिती करण्यात आली.

अवघ्या एका तासाच्या आत आरोपी गजाआड सदर
        गुन्ह्यात खालील आरोपींनी किरकोळ वादातून एकत्रितपणे हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. करण गोपाल मेश्राम वय २२ वर्ष, रा. भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर, यश छोटेलाल राऊत वय १९ वर्ष, रा. भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर, अनिल रामेश्वर बोंडे वय २२ वर्ष, रा. समता नगर दुर्गापूर, प्रतिक माणिक मेश्राम वय २२ वर्ष, रा. वार्ड क्र.४ दुर्गापूर, तौसिक अजीज शेख वय २३ वर्ष, रा. फातेमा मस्जिद जवळ वार्ड क्र.३ दुर्गापूर, सुजीत जयकुमार गणविर वय २५ वर्ष, रा. भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर व पोस्टे रामनगर येथील गुन्हे शाखा पथकाने अटक केली. या प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईचे नेतृत्व स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी केले. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक देवराव नरोटे, दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार, सहाय्यक फौजदार स्वामीदास चालेकर, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, इम्रान खान, नितीन साळवे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, अजय बागेसर, प्रमोद डंबारे, पोलीस अंमलदार हिरालाल गुप्ता, शंशाक बदामवार, शेखर माधनकर आदींनी कारवाई केली. 

#ChandrapurCrime #MurderCase #NiteshThakare #PoliceAction #RamNagarPolice #CrimeInvestigation #LocalCrimeBranch #JusticeServed #CrimeNews #BreakingNews #BreakingNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top