आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 24 ऑक्टोबर 2025) –
शहरातील रस्त्यांवर दोन चाकी वाहनांमध्ये फेरबदल करून कर्कश आवाज करणारे अनधिकृत सायलेन्सर लावून फिरणाऱ्या युवकांवर राजुरा पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने कारवाईची मोठी मोहिम हाती घेतली आहे. या कारवाईदरम्यान दोन बुलेट गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. वाहतूक पोलीसांच्या गस्तीमध्ये वाहतूक शाखा राजुरा येथील पोलीस कर्मचारी यांच्या निदर्शनास आले की, काही युवक बाईकवर अनधिकृत सायलेन्सर बसवून स्टंटबाजीसह मोठा आवाज करत शहरातील नागरिकांना त्रास देत फिरत आहेत. यानुसार कारवाई करण्यात आली.
विजय पाचभाई यांच्या ताब्यातील वाहन क्रमांक एमएच 34 बीए 5412 तसेच दीपक प्रजापती यांच्या ताब्यातील वाहन क्रमांक एमएच 34 बीएस 0834 ही दोन बुलेट गाड्या जप्त करण्यात आल्या. दोन्ही वाहनधारकांनी मोटारीमध्ये अनधिकृत फेरबदल केल्याने कलम 198 एमव्ही अॅक्टनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी 2000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच दोन्ही गाड्यांवर बसवलेले अनधिकृत सायलेन्सर काढून ते वाहतूक शाखा राजुरा येथे जमा करण्यात आले. या कारवाईमुळे शहरात स्टंटबाजी करणाऱ्या युवकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, "मोठा आवाज करणाऱ्या बाईकची संख्या आता कमी होईल," अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या संदर्भात पोलीस निरीक्षक सुमित प्रत्येकी, पोलीस स्टेशन राजुरा यांनी सांगितले, “कर्कश आवाज करणारे किंवा फटाक्यांसारखा आवाज करणारे सायलेन्सर बसवून रस्त्यावर फिरताना कोणतीही गाडी आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा प्रकारचा आवाज नागरिकांना त्रासदायक ठरतो आणि अचानक होणाऱ्या आवाजामुळे इतर वाहनचालक घाबरून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांनी असे सायलेन्सर लावले असतील त्यांनी त्वरित ते काढून टाकावेत.”
#RoadSafety #RajuraPoliceAction #IllegalSilencer #BulletSeized #TrafficRules #StopStuntRiding #NoisePollution #PoliceInAction #SafeRoads #FollowTrafficRules #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.