आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०६ ऑक्टोबर २०२५) -
चंद्रपूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एम.डी. (Mephedrone Drug) ड्रग्ज विक्री करणाऱ्याविरुद्ध मोठी कारवाई करत एकाला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ५२८ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, मोबाईल फोन आणि वाहन असा एकूण ३५,०७,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, वसीम इमदाद खान वय ३७, रा. बैगनवाडी, गोंवडी, मुंबई हा एम.डी. ड्रग्ज विक्रीसाठी त्याच्या MH10-EQ-0421 क्रमांकाच्या कारने चंद्रपूरकडे येत आहे. या माहितीनुसार नागपूर–चंद्रपूर महामार्ग क्रमांक ३६३ वरील साखरवाही फाटा, एच.पी. पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून पोलिसांनी आरोपीला वाहनासह पकडले.
तपासात आरोपीकडून ५२८ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज (प्रति ग्रॅम दर ₹५,०००, एकूण किंमत ₹२६,४०,०००), मोबाईल, रोख रक्कम आणि वाहन असा एकूण ₹३५,०७,४८० चा माल जप्त करण्यात आला. पडोली पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
२०२५ मधील NDPS कायद्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कारवाईचा आढावा :
- एकूण १५७ गुन्हे नोंद, १९२ आरोपींवर कारवाई
- जप्त मालाची एकूण किंमत ₹८०,५९,७७४
- गांजा प्रकरणात: २६ गुन्हे, ५५.२४ किलो गांजा, ४० आरोपी अटक, ₹६.६२ लाख माल जप्त
- एम.डी. ड्रग्ज प्रकरणात: १४ गुन्हे, ७२२.६१४ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, ३१ आरोपी, ₹४३.७८ लाख माल जप्त
- ब्राउन शुगर प्रकरणात: १ गुन्हा, २९८ ग्रॅम ब्राउन शुगर, २ आरोपी, ₹३०.१९ लाख माल जप्त
- सेवन करणारे आरोपी: १५६ गुन्हे, १८६ आरोपींवर कारवाई
नशामुक्त भारत अभियानात चंद्रपूर पोलीसांची जनजागृती मोहीम :
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलामार्फत “Say No To Drugs, Yes To Life” या घोषवाक्याखाली व्यापक नशामुक्ती मोहीम राबविण्यात आली आहे.
शाळा, कॉलेजांमध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, पोस्टर मोहीम
- १५ ऑगस्ट २०२५ रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते अभियानाचे फ्लेक्स अनावरण
- सायकल रॅली, ध्यानशिबिर, स्वयंसेवक, महिला समित्या व युवक मंडळांचा सहभाग
- गणेशोत्सव व नवरात्र उत्सवात नशामुक्ती संदेशाचे फलक प्रदर्शन
पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की -
“अंमली पदार्थविषयी कोणतीही माहिती असल्यास ‘Dial 112’ किंवा 7887890100 या क्रमांकावर कळवावी. आपली ओळख गुप्त ठेवण्यात येईल.”
कारवाईत सहभागी अधिकारी :
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पार पडली.
कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार -
सहायक पोलीस निरीक्षक दिपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहकार, इम्रान खान, सतिश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, पोशि हिरालाल गुप्ता, शंशाक बदामवार, किशोर वाकाटे, मपोहवा विजयमाला वाघमारे, पोहवा प्रमोद डंभारे, तसेच सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरचे अधिकारी सहभागी होते.
#ChandrapurPolice #DrugFreeChandrapur #SayNoToDrugs #MephedroneSeizure #AntiNarcoticsAction #NDPSAct #ChandrapurNews #PoliceAction #DrugAwareness #ChandrapurCrimeNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.