राजुरा तालुका भाजयुमोची नवी कार्यकारिणी जाहीर
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०६ ऑक्टोबर २०२५) -
भारतीय जनता युवा मोर्चा राजुरा तालुका मंडळाची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. राजुरा ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष वामन तुरानकर यांनी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी घोषित केली. या कार्यकारिणीत भाजपाच्या ग्रामीण भागातील सक्रीय युवा कार्यकर्ता व भुरकुंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजय राठोड यांची सलग दुसऱ्यांदा राजुरा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपाच्या संघटनात्मक कार्यात व विधानसभा निवडणुकीतील योगदानाचा विचार करून पक्षाने त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. ग्रामीण भागातील एका छोट्या गावातून पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या अजय राठोड यांच्या कार्यशैलीची व नेतृत्वगुणांची दखल घेत पक्षाने त्यांना पुन्हा एकदा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
या निवडीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, तालुकाध्यक्ष वामन तुरानकर, शहराध्यक्ष सुरेश रागीट, जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख, वाघूजी गेडाम, सुनील उरकुडे, जिल्हा सचिव संजय उपगन्लावार, मधुकर नरड, तसेच तालुका सरचिटणीस दिलीप गिरसावळे, हरिदास झाडे आणि सचिन बल्की यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
अजय राठोड : ग्रामीण भूमीतून उभा राहिलेला युवा नेतृत्वाचा चेहरा
राजुरा तालुक्यातील भुरकुंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजय राठोड हे भारतीय जनता पक्षाच्या युवा पिढीतील सक्रिय, संघटित आणि प्रखर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी पक्षकार्याची सुरुवात एका साध्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतून केली आणि सातत्य, मेहनत व संघटन कौशल्याच्या जोरावर स्थानिक पातळीवर मजबूत पकड निर्माण केली. त्यांनी विधानसभा निवडणुकांदरम्यान पक्षाच्या प्रचारयंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक गावांपर्यंत पक्षाची धोरणे पोहोचवली. त्यांच्या समन्वय क्षमतेमुळे युवा कार्यकर्त्यांना संघटित करण्यास ते यशस्वी ठरले. सामाजिक जाणीव असलेले अजय राठोड हे स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, युवकांना रोजगार मार्गदर्शन, शैक्षणिक मदत, ग्रामविकास उपक्रम अशा अनेक समाजाभिमुख कार्यात सहभागी राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आज ते राजुरा तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.
संक्षिप्त परिचय:
- नाव: अजय राठोड
- पद: भाजयुमो राजुरा तालुकाध्यक्ष (दुसऱ्यांदा निवड)
- इतर जबाबदारी: भुरकुंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच
- विशेष ओळख: ग्रामीण भागातून उभा राहिलेला सक्रीय, संघटित आणि प्रामाणिक भाजप युवा नेता
- कार्य क्षेत्र: संघटन बांधणी, सामाजिक उपक्रम, युवक सक्षमीकरण
नवी कार्यकारिणी जाहीर:
भाजयुमो सरचिटणीसपदी- प्रफुल कावळे, हर्षल वनकर, आशिष झुरमुरे, कोषाध्यक्षपदी – विशाल जानवे, उपाध्यक्षपदी – राहुल साळवे, राजकुमार मेकलवार, शिवा बोंकुर, स्वप्नील राजूरकर, वैभव पावडे, निखील अमर, सचिन बोबडे, संदेश दुर्गे, नंदकिशोर कुबडे, आशिष चांदेकर, प्रशांत मासिरकर, सुयश बोबडे, गणेश मुसळे, आदित्य वैरागडे, चिटणीसपदी – अतुल किटे, पियूष हिंगाने, नंदू पारखी, सचिन निमकर, जयवंत चोथले, सिद्धार्थ चांदेकर, विशाल भेंडे, अंकुर सलाम, योगेश वडस्कर, अनिल बहिरे, वसंत अजमेरा, राकेश लांडे, अजय जाधव, सुरज हरिहर, संदेश वडस्कर, मारोती चन्ने, प्रसिद्धी प्रमुखपदी- सुरज भोस्कर, सोशल मिडिया प्रमुखपदी- प्रणय डवरे, सदस्य- शुभम येरणे, श्रीनिवास राठोड, निखील चटके, सोनू कांबळे, आकाश खेकारे, अमर घुगलोत, समाधान कोरडे, अजय काकडे, अक्षय वाघमारे, गौरव सुर्तेकार, अश्विन फुलमारे, नरेश राठोड, रोशन काळे, अभिलाष देवाळकर, उदय नूलावार, सोमेश्वर मडावी, सुयोग सातपुते, सुरेश अजमेरा, संतोष मरस्कोल्हे, जय शेंडे, आदित्य गज्जमवार, नवनाथ जाधव, राजु गेडाम, किरण जांभोड, शंकर बोटपल्ले.
#RajuraNews #BJYM #AjayRathod #YouthLeadership #BJPYouthWing #VidarbhaPolitics #ChandrapurUpdates #RajuraPolitics #YoungLeader #TeamBJYM #BJP #RuralLeadership #InspiringYouth #AjayRathore #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.