Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुराच्या शिवाजी महाविद्यालयाला मिळाले तीन मेरिटस्थानांचे यशमुकुट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शिस्त, मेहनतीच्या जोरावर विद्यार्थिनींचे विद्यापीठात यशस्वी यश आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ०६ ऑक्टोबर २०२५) -         आदर्श शिक्षण ...
शिस्त, मेहनतीच्या जोरावर विद्यार्थिनींचे विद्यापीठात यशस्वी यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०६ ऑक्टोबर २०२५) -
        आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा संचालित श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थिनींनी यंदाच्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून, महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

        अलिकडेच जाहीर झालेल्या निकालात बी.कॉम अंतिम वर्षातील विद्यार्थिनी प्रिती आसुटकर हिने विद्यापीठाच्या आठव्या क्रमांकावर स्थान मिळवले. तसेच एम.कॉम अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कोमल साळवे हिनेही आठवी मेरिट पटकावली. याच महाविद्यालयातील बी.एस्सी अंतिम वर्षाची विद्यार्थिनी सुहाना शेख हिने तिसरी मेरिट मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

        या तीनही गुणवंत विद्यार्थिनींचा महाविद्यालयात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अविनाश जाधव, कोषाध्यक्ष साजिद बियाबानी, प्राचार्य एस. एम. वारकड, उपप्राचार्य राजेश खेराणी, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. शुभम बोर्डेवार, तसेच प्रा. जया मेहेर, प्रा. संतोषी सरकार आणि प्रा. शुभम बोबाटे उपस्थित होते.

        प्राचार्य एस.एम. वारकड यांनी विद्यार्थिनींच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, “शिस्त, सातत्य आणि अभ्यासातील प्रामाणिकपणा हे यशाचे खरे गमक आहे. आमच्या विद्यार्थिनींनी हे दाखवून दिले आहे.” यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

#RajuraNews #EducationExcellence #GondwanaUniversity #ShivajiCollegeRajura #MeritStudents #GirlPower #AcademicSuccess #VidarbhaNews #ChandrapurUpdates #InspiringStudents #aadarshshikshanprasarakmandal #ShriShivajiCollegeofArts,CommerceandScience #shivajicollagerajura #GondwanaUniversityGadchiroli #GondwanaUniversity #Gadchiroli #avinashjadhav #Principal #SMWarkad #sambhajiwarkad #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top