Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: "पावसासोबत आले मृत्यूचे सावट; दोन जखमी, एक बळी"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"तरुणीच्या मृत्यूने गावात हळहळ – प्रशासनाची मदत प्रक्रिया सुरू" आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ०६ ऑक्टोबर २०२५) -         र...
"तरुणीच्या मृत्यूने गावात हळहळ – प्रशासनाची मदत प्रक्रिया सुरू"
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०६ ऑक्टोबर २०२५) -
        राजुरा तालुक्यातील कोहपरा येथे आज दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत ज्योत्सना प्रमोद कानमपल्लीवार वय अंदाजे २५ वर्षे या तरुणीचा विजेच्या धक्‍क्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शेतात पाऊस सुरू असताना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक ज्योत्सना प्रमोद कानमपल्लीवार या आपल्या शेतात काम करत असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यांनी पावसापासून बचावासाठी शेतातील झोपडीत आसरा घेतला. त्याच दरम्यान अचानक आकाशातून वीज कोसळली आणि ज्योत्सना हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत पती प्रमोद कानमपल्लीवार, सासू कानमपल्लीवार तसेच आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. तिन्ही जखमींना तात्काळ चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

        ज्योत्सना यांच्या मागे दोन लहान मुले असून, घराची कर्ती महिला गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक घडलेल्या या अपघातामुळे कोहपरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन निधीतून मदत मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे प्रशासन सूत्रांनी सांगितले.

#Rajura #Kohpara #ChandrapurNews #LightningStrike #TragicIncident #MaharashtraNews #RuralLife #Vidarbha #LocalNews #FarmAccident #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top