आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०१ ऑक्टोबर २०२५) -
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजुरा तालुक्यातील गोवरी शाखेच्या नूतन व स्थलांतरित इमारतीचे उद्घाटन थाटामाटात पार पडले. या नव्या इमारतीचे उद्घाटन माजी आमदार तसेच बँकेचे संचालक सुदर्शन निमकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यास बँकेचे संचालक उल्हास करपे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद माजी सभापती सुनील उरकुडे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती मारोती पाटील लोहे, गोवरी ग्रामपंचायत सरपंच आशा उरकुडे, बँकेचे विभागीय अधिकारी जोगी उपस्थित होते. यावेळी विशेष उपस्थितीत सेवा सहकारी संस्था गोवरी अध्यक्ष रामदास जीवतोडे, सेवा सहकारी संस्था चिंचोली अध्यक्ष मनोहर काळे, गोवरी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष नागेश्वर ठेंगणे, सुधाकर चंदनखेडे, प्रदीप बोबडे यांची नावे विशेषत्वाने घेण्यात आली.
बचत गटांच्या महिला तसेच गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिल्याने हा उद्घाटन सोहळा उत्सवी वातावरणात पार पडला. नव्या व सुसज्ज इमारतीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांना बँकिंग सुविधा अधिक सोप्या आणि सक्षम पद्धतीने उपलब्ध होणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
#Rajura #Gouri #CooperativeBank #BankBranchOpening #Chandrapur #Vidarbha #RuralBanking #FarmersBank #ExMLA #sudarshannimkar #ChandrapurDistrictCentralCooperativeBank #CooperativeMovement #CommunityDevelopment #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.